By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 23, 2019 01:34 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
आपल्या चिंतामडका गावातील दोन हजार कुटुंबांना प्रत्येकी 10 लाख रुपये आणि नवे घर बांधून दिले जाईल, अशी घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चन्द्रशेखर राव यांनी केली आहे. गावातील नागरिकांना स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी राव यांनी ही अवाढव्य घोषणा केली आहे.
चन्द्रशेखर राव हे त्यांच्या सीद्दिपेट या जिल्हा दौर्यावर होते. त्यावेळी त्यांचा भाचा आणि सिद्दिपेट मतदार संघाचे आमदार हरिशराव व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे राज्याच्या तिजोरीवर 400 कोटी रूपयांचा भार पडणार आहे.
या घोषणेमुळे मुख्यमंत्र्यांवर अनेक प्रकारे टीकाही होत आहे. तुम्हाला इतकेच पैसे वाटप करायचे असतील तर स्वत:च्या खिशातून द्या, राज्याच्या तिजोरीवर का भार देत आहात?, असेही प्रश्न विचारले जात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीर मुद्यावर तोडगा काढण्यासाठी अमेरिकेच....
अधिक वाचा