ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

"अजित पवारांशिवाय सरकार होऊ शकत नाही, 30-35 आमदार अस्वस्थ"

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 25, 2019 10:32 AM 2019-02-12T14:15:30+5:30

शहर : मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला निर्णय मागे न घेण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मात्र, तरिही राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरुच आहेत.राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी देखील आज अजित पवार यांची भेट घेत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला.तसेच पक्षातील आमदारांच्या भावना काय आहेत याचीही त्यांना कल्पना दिली.

विशेष म्हणजे छगन भुजबळ यांनी रविवारी (25 नोव्हेंबर) देखील अजित पवारांना फोन करुन त्यांच्याशी चर्चा केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छगन भूजबळ यांनी अजित पवार यांना त्यांच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे 30-35 आमदार अस्वस्थ असल्याची माहिती दिली आहे. तसेच राष्ट्रवादीत परत येण्याचे आवाहनही केले आहे.

अजित पवार यांच्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही, असंही या अस्वस्थ आमदारांचं म्हणणं असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील गुंतागुंत समोर आली आहे. यातून मोठं नुकसान होऊ नये म्हणूनच राष्ट्रवादीकडून अजित पवार यांचं मन वळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न होत आहेत.

दरम्यान, छगन भुजबळ यांनी रविवारी (24 नोव्हेंबर) रात्री अजित पवारांना फोन करून रविवारी भेटायला येत असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आज सकाळी भुजबळ अजित पवारांच्या भेटीला गेले. काही वेळातच जयंत पाटील देखील अजित पवार यांना भेटणार असल्याची माहिती येत आहे.

 

मागे

अजित पवारांनी असं का केलं ठाऊक नाही- शरद पवार
अजित पवारांनी असं का केलं ठाऊक नाही- शरद पवार

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सोमवारी सकाळीच कराडच्या दिशेने रवाना झ....

अधिक वाचा

पुढे  

अजित पवारांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी होणार? शरद पवारांनी दिलं उत्तर
अजित पवारांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी होणार? शरद पवारांनी दिलं उत्तर

अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय भू....

Read more