ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शिवसेना नेत्यांची अनेक वर्षांनी भेट झाली, छगन भुजबळ म्हणतात...

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 15, 2019 11:04 AM 2019-02-12T14:15:30+5:30

शिवसेना नेत्यांची अनेक वर्षांनी भेट झाली, छगन भुजबळ म्हणतात...

शहर : मुंबई

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अखेर सत्तास्थापनेसाठी आवश्यक किमान समान कार्यक्रमाचा मसूदा तयार केला आहे. आता हा मसूदा तिन्ही पक्षाच्या प्रमुखांना पाठवण्यात येणार आहे. तिन्ही पक्षांच्या समन्वय समितीतील नेत्यांनी आज याची माहिती माध्यमांना दिली. विशेष म्हणजे शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या छगन भुजबळ यांना पत्रकारांनी इतक्या वर्षांनी शिवसेना नेत्यांना भेटून कसं वाटलं असाही प्रश्न विचारला.

पत्रकारांच्या प्रश्नावर छगन भुजबळ म्हणाले, “शिवसेना नेत्यांची अनेक वर्षांनी भेट झाली. एकत्र बसून चर्चा केली. हा योग चांगला होता. शिवसेना नेत्यांना केवळ मीच भेटलो असं नाही, तर काँग्रेस, राष्ट्रवादीचे सर्वच नेते भेटले. आमच्या पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार ही बैठक झाली. दोन दिवस ही बैठक सुरु होती. त्यात आम्ही शेतकरी, महिला, रोजगार, अल्पसंख्यांक, ओबीसी, एससी, एसटी अशा सर्वांसाठी एक कार्यक्रम बनवला आहे. त्यात अजून काही सुधारणा असतील तर आमचे पक्षप्रमुख ते सांगतील. त्याप्रमाणे त्यात काही बदल होऊ शकेन.”

आज राज्य अनेक अडचणींमध्ये सापडलं आहे. अशा स्थितीत सुकाणू कुणाच्याच ताब्यात नाही. तो राज्यपालांच्या नियंत्रणात आहे. त्यामुळे पुढे काही पाऊलं पडून सत्तास्थापन होणं आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. एक महत्वाचं पाऊल पुढे पडलं आहे. आता पुढील निर्णय आमचे पक्षप्रमुख घेतील, असंही भुजबळ यांनी यावेळी नमूद केलं.

 

 

मागे

क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकतं,मॅच हातातून गेली वाटत असतानाच …: गडकरी
क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकतं,मॅच हातातून गेली वाटत असतानाच …: गडकरी

क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकतं, हातातली मॅच जात आहे, असं वाटत असतानाच....

अधिक वाचा

पुढे  

'मी क्रिकेट सामन्यांचा आयोजक, क्रिकेट खेळत नाही, खेळवतो' - शरद पवार
'मी क्रिकेट सामन्यांचा आयोजक, क्रिकेट खेळत नाही, खेळवतो' - शरद पवार

मी क्रिकेट सामन्यांचा आयोजक आहे, मी सामने खेळवतो, मी खेळाडू नाही, क्रिकेट खे....

Read more