ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

छगन भुजबळ यांचा परिचय

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 28, 2019 07:39 PM 2019-02-12T14:15:30+5:30

छगन भुजबळ यांचा परिचय

शहर : मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू मानले जातात (NCP Chhagan Bhujbal Profile). त्यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाचीही धुरा सांभाळलेली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. त्यांनी आज (28 नोव्हेंबर) कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.

छगन भुजबळ यांची वैयक्तिक माहिती

नाव : छगन चंद्रकांत भुजबळ

जिल्हा : नाशिक

पक्षराष्ट्रवादी काँग्रेस

वय – 72 वर्षे

शिक्षणमेकॅनिकल इंजिनियरिंग पदविका

छगन भुजबळ यांची कारकिर्द

शिवसेनेतून राजकारणाची सुरुवात

1973 मुंबई महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून गेले

1973 ते 84 मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेता

1985 मध्ये मुंबईचे महापौर

1991 मध्ये दुसऱ्यांदा मुंबई महापालिकेत मुंबईचे महापौर

1991 मध्ये शिवसेना सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश

1999 मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर भुजबळांचाही राष्ट्रवादीत प्रवेश

1985 आणि 1990 अशा दोन वेळा मुंबईतील माझगावमधून विधानसभेवर निवड

नोव्हेंबर 1991 मध्ये महसूलमंत्री

1995 पर्यंत गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा या खात्याचे मंत्री

एप्रिल 1996 मध्ये विधान परिषदेत विरोधी पक्षनेते

18 ऑक्टोबर 1999 रोजी उपमुख्यमंत्री. सोबतच गृह आणि पर्यटन खात्यांचाही कारभार सांभाळला

एप्रिल 2002 मध्ये विधान परिषदेवर बिनविरोध निवड

एप्रिल 2002 ते 23 डिसेंबर 2003 या कालावधीत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री

2004 मध्ये येवला मतदारसंघातून विधानसभेवर निवड

नोव्हेंबर 2004 ते 3 डिसेंबर 2008 या कालावधीत सार्वजनिक बांधकाममंत्री

8 डिसेंबर 2008 रोजी महाराष्ट्राचे दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री

        

 

मागे

जयंत पाटील यांचा परिचय
जयंत पाटील यांचा परिचय

उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचा महत्त्वाचा चेहरा म्हणजे प....

अधिक वाचा

पुढे  

नितीन राऊत यांचा परिचय
नितीन राऊत यांचा परिचय

उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात काँग्रेसकडून ऐनवेळी आलेलं नाव म्हणजे नि....

Read more