ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

छगन भुजबळ यांची प्रकृती बिघडली, जसलोक रुग्णालयात दाखल

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 31, 2019 06:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30

छगन भुजबळ यांची प्रकृती बिघडली, जसलोक रुग्णालयात दाखल

शहर : मुंबई

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोटाच्या विकारावरील उपचारांसाठी भुजबळ काल रात्री रुग्णालयात दाखल झाले आहेत. विधानसभा निवडणुकीतील महिनाभराच्या धावपळीमुळे प्रकृतीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे पोटात दुखू लागल्याचे सांगण्यात येत आहे.

भुजबळ यांच्यावर उपचार सुरु आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, राष्ट्रवादीचे आणखी एक नेते धनंजय मुंडे यांच्या पोटात दुखू लागल्याने रात्री उशिरा त्यांना मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  दरम्यान धनंजय मुंडे यांनी आपली प्रकृती ठीक असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं ट्विट केले आहे.

याआधी महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणात तुुरुंगात असतानाही छगन भुजबळ यांची प्रकृती दोन ते तीनवेळा बिघडली होती. त्यावेळीही त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ते जामिनावर सुटले, त्यांनी विधानसभा निवडणुकीचा प्रचार केला. विधानसभा निवडणुकीत ते येवलामधून भुजबळ निवडणूक जिंकले आहेत. आता त्यांना पुन्हा एकदा उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे त्यांना जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

 

मागे

शिवसेनेच्या विधिमंडळ नेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड
शिवसेनेच्या विधिमंडळ नेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड

शिवसेनेच्या विधिमंडळ नेतेपदी गुरुवारी पक्षातील ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे ....

अधिक वाचा

पुढे  

राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग
राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

शिवसेना आणि भाजप यांच्यात सत्तावाटपावरून मानापमान नाट्य रंगल्याने विधानस....

Read more