By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 09, 2020 10:47 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यांनी उदयनराजेंना ‘बिनडोक राजा’ म्हणून संबोधलं होतं. त्यावर आता छत्रपती संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उदयनराजेंबाबतचं आंबेडकरांचं वक्तव्य पटलं नाही, असं म्हणत संभाजीराजेंनी नाराजी व्यक्त केली आहे.
“प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज आहेत. शाहू महाराज आणि बाबासाहेब यांचे चांगले संबंध होते. आमच्या बंधुंवर वक्तव्य करणे मला पसंत पडले नाही, त्यांनी तसे वक्तव्य करु नये, माझ्याबद्दल ते काही बोलले असतील तर ती लोकशाही आहे”, असं मत संभाजीराजेंनी प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर व्यक्त केलं.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यांनी उदयनराजेंना ‘बिनडोक राजा’ म्हणून संबोधलं होतं. त्यावर आता छत्रपती संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उदयनराजेंबाबतचं आंबेडकरांचं वक्तव्य पटलं नाही, असं म्हणत संभाजीराजेंनी नाराजी व्यक्त केली
“प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज आहेत. शाहू महाराज आणि बाबासाहेब यांचे चांगले संबंध होते. आमच्या बंधुंवर वक्तव्य करणे मला पसंत पडले नाही, त्यांनी तसे वक्तव्य करु नये, माझ्याबद्दल ते काही बोलले असतील तर ती लोकशाही आहे”, असं मत संभाजीराजेंनी प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर व्यक्त केलं.
भारतीय राजकारणातील एक मोठे नेते केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं आज न....
अधिक वाचा