By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 12, 2019 12:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
पुणे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज शिवनेरी किल्ल्यावर आणि एकवीरा देवीच्या दर्शनासाठी जाणार गेले. त्यांनी लोणावळा जवळील कार्ला येथील एकविरा देवीचं दर्शन सहकुटुंब घेतलं आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे प्रथमच एकविरा देवीच्या दर्शनाला पोहोचले. एकविरा देवी ठाकरे कुटुंबाची कुलदैवत आहे.
एकविरा देवीचं दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरे शिवनेरी गडावर जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असणाऱ्या शिवनेरी गडावरुन उद्धव ठाकरे सरसकट शेतकरी कर्जमाफीची घोषणा करु शकतात असे संकेत आहेत. पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना लवकरच भरीव मदत देणार असल्याचं जाहीर केलं होतं.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसप्रणित महाविकास आघाडीच्या महत्त्वाकांक्षी सरसकट शेतकरी कर्जमाफीसाठी सुमारे ६० हजार कोटी रुपयांहून अधिक निधी लागणार आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारलाही हा निधी कर्जरूपानेच उभारावा लागणार असल्याने सुमारे पावणेपाच लाख कोटी रुपये कर्जाचा बोजा मोठय़ा प्रमाणावर वाढणार आहे.
मुंबई- नागरिकत्व सुधारणा विधेयक बुधवारी संध्याकाळी राज्यसभेत मंजूर झाल....
अधिक वाचा