By Dinesh Shinde | प्रकाशित: डिसेंबर 02, 2019 05:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आज महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना विरोधी पक्षनेत्यांना शासकीय बंगल्याचे वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वर्षा विधानसभेत विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मलबार हिलमधील सागर या शासकीय बंगल्याचे वाटप करण्यात आले.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, राज्यात राष्ट्रपती लागू होताच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन महिन्यांसाठी वर्षावर राहण्याची परवानगी मिळवली होती. दरम्यानच्या काळात ते स्वत: ८० तासांसाठी मुख्यमंत्री झाले. मात्र बहुमत सिद्ध करणे शक्य नसल्याचे दिसताच त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी-कॉंग्रेस महाविकास आघाडी सत्तास्थानी येताच देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ वर्षा निवासस्थानी खाली केली. मात्र सरकार स्थापन होऊन पाच दिवस झाले तरी मंत्र्यांना बंगल्याचे वाटप करण्यात आले नव्हते. त्यासंदर्भात आज निर्णय घेण्यात आला.
या निर्णायाप्रमाणे शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांना रॉयल स्टोन राष्ट्रवादी-कॉंग्रेसचे मंत्री छगन भूजबळ यांना रामटेक तर जयंत पाटील यांना सेवासदन हा बंगला देण्यात आला.
आज दि. २ डिसेंबरपासून नक्षलवाद्यांच्या शहीद सप्ताह सुरू झाला आहे. या पाहिल्....
अधिक वाचा