ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पंतप्रधानांच्या बुलेट ट्रेन प्रकल्पावर मुख्यमंत्र्यांचे टीकास्त्र

By NITIN MORE | प्रकाशित: फेब्रुवारी 04, 2020 02:40 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पंतप्रधानांच्या बुलेट ट्रेन प्रकल्पावर मुख्यमंत्र्यांचे टीकास्त्र

शहर : मुंबई

                मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट असलेल्या 'बुलेट ट्रेन' प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला आहे. महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पांढरा हत्ती म्हणत त्यावर टीका केली आहे.  बुलेट ट्रेन प्रकल्पावर सगळ्यांच्या निर्णयाने आणि योग्य असा विचार करायला हवा. असे सांगताना बुलेट ट्रेनचा उपयोग कोणाला होणार आहे? तसेच या प्रकल्पामुळे किती उद्योगधंद्यांना चालना मिळणार? असे प्रश्न उपस्थित केले आहेत. 

           बुलेट ट्रेन प्रकल्प किती महत्वाचा आहे, हे लोकांना पटवून द्या, जनतेसमोर जाऊन निर्णय घ्यावे लागतील, असे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला केले आहे. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग प्रकाशित करण्यात आला असून, त्यामध्ये त्यांनी विविध मुद्द्यांना हात घालत केंद्र सरकारवर टीकेचे प्रहार केले. बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्याच्या आर्थिक परिस्थितीकडे लक्ष देत राज्याच्या विकासाची प्राथमिकता ठरविली पाहिजे. 
 

मागे

...म्हणून मोदी सरकारने मौल्यवान मालमत्ता विकायला काढल्या आहेत: कपिल सिब्बल
...म्हणून मोदी सरकारने मौल्यवान मालमत्ता विकायला काढल्या आहेत: कपिल सिब्बल

          नवी दिल्ली :  केंद्र सरकार एअर इंडियातील १०० % हिस्सा विकणार ....

अधिक वाचा

पुढे  

मैं शपथ लेता हू, अरविंद केजरीवाल यांनी घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
मैं शपथ लेता हू, अरविंद केजरीवाल यांनी घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

व्हीआयपी नेत्यांना आमंत्रण टाळत ‘आम आदमी पक्षा’चे अध्यक्ष अरविंद केजरी....

Read more