ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

प्रियंका गांधींच्या कपड्यांवर हात टाकणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा- चित्रा वाघ

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 04, 2020 08:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30

प्रियंका गांधींच्या कपड्यांवर हात टाकणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा- चित्रा वाघ

शहर : मुंबई

महाराष्ट्र भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी उत्तर प्रदेशमध्ये महिला नेत्यांसोबतच्या पोलीस वर्तनावर तीव्र आक्षेप घेतले आहेत. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांच्यासोबतच्या पोलिसांच्या गैरवर्तनाचा फोटो ट्विट करत चित्रा वाघ यांनी उत्तर प्रदेश पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महिला नेत्यांच्या कपड्यांवर हात टाकण्याची पोलिसांची हिंमत कशी होते, असा संतप्त प्रश्न त्यांनी विचारला. चित्रा वाघ यांनी संबंधित पोलिसांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली आहे.

चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, “महिला नेत्यांच्या कपड्यावर हात टाकण्याची पुरुष पोलिसांची हिंमत कशी होते? जर महिला समोर येऊन एखाद्या गोष्टीला पाठिंबा देत असतील तर कुठलेही पोलीस असेना त्यांनी आपल्या मर्यादांचं भान ठेवलं पाहिजे. भारतीय संस्कृतीत विश्वास ठेवणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तात्काळ दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी.”

दरम्यान, चित्रा वाघ यांनी हाथरस अत्याचार प्रकरणावरुन महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरही टीका केली होती. अनिल देशमुख यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला होता. गृहमंत्र्यांच्या टीकेनंतर चित्रा वाघ यांनी त्यांना प्रत्युत्तर देताना महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेची आठवण करुन दिली होती.

हाथरसमधल्या सामूहिक बलात्कारातील पीडितेला श्रद्धांजली अर्पण करताना, ‘फिल्म सिटीऐवजीगुंडांपासून क्लिन सिटीवर आपण भर दिलात तर माताभगिनींसाठी अधिक उपयुक्त ठरेल, असा निशाणा अनिल देशमुख यांनी योगींवर साधला होता. त्यावरकोविड-क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलांवर बलात्कार, विनयभंग केले जातात. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालाय, त्यावर तुम्हाला ट्विट करावंसं वाटलं नाही का?”, असा सवाल चित्रा वाघ यांनी गृहमंत्र्यांना विचारला होता.

गृहमंत्रीजी, हाथरसच्या घटनेचा आम्ही तीव्र निषेधच करतो. पण मला सांगा राज्यात अल्पवयीन मुलींवर सामुहीक बलात्कार करून खूनाचं सत्र सुरू आहे. कोविड-क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलांवर बलात्कार होतायत, विनयभंग केले जातात, कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालाय त्यावर तुम्हाला ट्विट करावंसं वाटलं नाही का?”, असा सवाल चित्रा वाघ यांनी ट्विट करत गृहमंत्र्यांना विचारला.

मागे

काँग्रेस सत्तेत येताच तिन्ही कृषी कायदे रद्द करणार, राहुल गांधी यांची घोषणा
काँग्रेस सत्तेत येताच तिन्ही कृषी कायदे रद्द करणार, राहुल गांधी यांची घोषणा

केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकऱ्या....

अधिक वाचा

पुढे  

आता सुशांतप्रकरणाचा अहवाल अंध भक्त नाकारणार काय?, शिवसेनेचा सवाल
आता सुशांतप्रकरणाचा अहवाल अंध भक्त नाकारणार काय?, शिवसेनेचा सवाल

एम्स’ने सुशांतप्रकरणी जो अहवाल दिला, तो अंध भक्त नाकारणार आहेत काय? सुशांत....

Read more