By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 18, 2019 03:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : रायगड
लोकसभा निवडणूकीच्या प्रचार जोरात चालू असताना रायगड मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर प्रचार सभा घेण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला. तटकरेंनी जे काही रायगडमध्ये केलं ते अनिल गिते करू शकणार नाहीत असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. रायगडमध्ये सुनील तटकरेंनी भ्रष्टाचार केला, पैसा कमावला, कंपन्या उभारल्या असं काहीही अनिल गिते करू शकणार नाही अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.
पवारांवरून सुनील तटकरेंना केलं लक्ष
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभेच्या माढा मतदारसंघातून माघार घेतली. त्यामुळे जर कॅप्टनच मागे होत असेल तर तटकरी किस झाड की मूली है’ असं शब्दात मुख्यमंत्र्यांनी सुनील तटकरे यांच्यावर टीका केली.
मराठी माणसांच्या हितासाठी, मराठी माणसांच्या भल्यासाठी शिवसेनेची स्थापना ....
अधिक वाचा