ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अजून मतदानच नाही, मात्र मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलीत या मंत्र्यांची नावं!

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 16, 2019 02:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अजून मतदानच नाही, मात्र मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलीत या  मंत्र्यांची नावं!

शहर : मुंबई

विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आलाय. प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचलीय. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोज किमान तीन ते चार सभा घेऊन विरोधकांवर हल्लाबोल करताहेत. मतदानाला काही दिवसच राहिले आहेत. 24 ऑक्टोबरला निकाल लागणार आहेत. त्यानंतर ज्या पक्षाला बहुमत मिळेल तो पक्ष सरकार स्थापन करणा आहे. मात्र विजयाचा आत्मविश्वास व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंतच्या प्रचारात चार जणांना मंत्री करणार अशी घोषणाही केलीय. या सर्व लढती भाजपसाठी प्रतिष्ठेच्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी ज्या नावांची घोषणा केली त्यात कर्जत जामखेडमधून - राम शिंदे, माण-खटाव - जयकुमार गोरे, पुसद - निलय नाईक आणि चांदवड - राहूल आहेर यांचा समावेश आहे.

कर्जत जामखेडमधून राम शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून रोहित पवार उभे असून या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. तर विदर्भातल्या राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या जागेवर नाईक विरुद्ध नाईक अशी लढत होतेय. पुसदमध्ये विद्यमान आमदार मनोहर नाईक यांचा मुलगा इंद्रनील नाईक यांना राष्ट्रवादीने तिकीट दिलंय. तर भाजपने त्यांचेच नातेवाईक निलय नाईक यांना मैदानात उतरवलं. सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री आपला शब्द पाळतात का याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. 21 ऑक्टोबरला राज्यातल्या 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून आश्वासनांची खैरात केली जात आहे. भाजपने मंगळवारी त्यांचे संकल्पपत्र प्रकाशित केलं आहे. 16 कलमी संकल्पपत्रात भाजपने दुष्काळमुक्ती, पाणी, रोजगार, शिक्षण आणि आर्थिक विकास या मुद्यांवर भर दिला आहे. संपन्न, समृद्ध आणि समर्थ महाराष्ट्राचे संकल्पपत्र अशी टॅगलाईन वापरून भाजपने 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी संकल्पपत्र प्रकाशित केलं.

 

मागे

शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला
शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला

शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला झाला आहे. उस्मानाबा....

अधिक वाचा

पुढे  

भाजप आमदार पुत्राचा भर सभेत पाणउतारा
भाजप आमदार पुत्राचा भर सभेत पाणउतारा

आमदारांच्या कामाचा पंचनामा करताना बऱ्याच वेळा लोक आक्रमक होतात. नेते फक्त ....

Read more