By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 23, 2019 03:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महाराष्ट्रात आमच्या युतीने अभूतपूर्व कामगिरी केली आहे. मागच्या वेळीस आम्ही 41 जागा जिंकल्या होत्या. यावेळेस त्याहीपेक्षा जास्त जागा जिंकू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. देशात मोदींच्या नेतृत्वात एनडीएला प्रचंड बहुमत मिळाले आहे. या देशात मोदीजींच्या बाजूने सायलेंट वेव आहे. देशातील जनता मोदींना निवडून देण्यास तयार असल्याचे दिसून आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
दुष्काळासारख्या समस्यातून आपल्याला युतीचे सरकार बाहेर काढू शकेल असा विश्वास जनतेला आहे. त्यामुळेच आमच्यावर विश्वास दाखवल्याचे ते म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी इतर घटक पक्षांचेही आभार मानले.
मावळ मतदारसंघातील पार्थ पवार यांच्या पराभवानंतर गुरुवारी राष्ट्रवादी काँ....
अधिक वाचा