ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अमित ठाकरेंवरुन शिवसेनेत गदारोळ; एकनाथ शिंदेंकडून सदा सरवणकरांना 24 तासांचा अल्टिमेटम; 'तुमची...'

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 27, 2024 08:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अमित ठाकरेंवरुन शिवसेनेत गदारोळ; एकनाथ शिंदेंकडून सदा सरवणकरांना 24 तासांचा अल्टिमेटम; 'तुमची...'

शहर : मुंबई

माहीम मतदारसंघावरुन (Mahim Constituency) महायुतीत गदारोळ सुरु असल्याचं चित्र आहे. अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना माहीममधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांना पाठिंबा दिला जावा अशी महायुतीची भूमिका आहे. मात्र सदा सरवणकर (Sada Sarvabkar) माघार घेण्यास इच्छुक नाहीत

माहीम मतदारसंघावरुन (Mahim Constituency) महायुतीत गदारोळ सुरु असल्याचं चित्र आहे. मनसेकडून अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना माहीममधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांना पाठिंबा दिला जावा अशी महायुतीची भूमिका आहे. मात्र सदा सरवणकर (Sada Sarvabkar) माघार घेण्यास इच्छुक नाहीत. सदा सरवणकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांमध्ये शिष्टाईचे प्रयत्न सुरू असल्याचं समजत आहे. यादरम्यान एक मोठी घडामोड समोर आली असून, एकनाथ शिंदे यांनी सदा सरवणकर यांना 24 तासांचा अल्टिमेटम दिला आहे.  

सदा सरवणकर यांना आपली यांना भूमिका ठरवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 24 तासांची मुदत दिली आहे. नुकतीच सदा सरवणकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. महायुती माहीम विधानसभा मतदारसंघात मनसेचे उमेदवार अमित राज ठाकरेंना पाठिंबा देण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सदा सरवणकर यांना सांगितलं आहे. राज ठाकरे यांनी लोकसभेला मदत केली होती. यापुढेही त्यांची मदत होईल असं एकनाथ शिंदे यांनी सदा सरवणकर यांना सांगितलं असल्याचं समजत आहे.

आशिष शेलारांनी मांडली होती भूमिका 

अमित ठाकरेंना (Amit Thackeray) पाठिंबा देण्यासाठी आशिष शेलार (Ashish Shelar) प्रस्ताव पाठवणार असल्याचं समजत आहे. सदा सरवणकरांच्या (Sada Sarvankar) उमेदवारीला विरोध नाही असंही आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच अमित ठाकरेंना पाठिंबा दिला तर जमणार नाही का? असा उलट सवालही आशिष शेलार यांनी विचारला आहे. दरम्यान अमित ठाकरे 28 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. सध्याच्या स्थितीनुसार, माहीम मतदारसंघात तिहेरी लढत होणार आहे. शिवसेनेकडून सदा सरवणकर, उद्धव ठाकरेंच्या पक्षाककडून महेश सावंत रिंगणात आहेत

आशिष शेलार काय म्हणाले?

"मी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार या तिघांनाही विनंती आणि चर्चा करणार आहे. महायुतीत कोणताही मतभेद, दरार नाही. सदा सरवणकर यांच्या उमेदवारीलाही आमचा विरोध नाही. पण असं का होऊ शकत नाही की, महायुती म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्याच घरातील, राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे पहिल्यांदा निवडणूक लढवत असेल, तर महायुती आपण सर्वांनी त्याला समर्थन देऊ. आपण सगळेजण त्यांना निवडून देऊ," असं आशिष शेलार म्हणाले आहेत

"राज ठाकरेंनी सर्वांशी संबंध जपले. उद्धव ठाकरेंना वाटत नसलं तरी आम्हाला वाटतं. अमितला समर्थन द्यावं अशी माझी भूमिका आहे. मी तिघांशी बोलेन, मतभेद असेल तर दूर केले जातील, महाराष्ट्राची संस्कृती जपली जावी," असंही आशिष शेलार म्हणाले आहेत

 महायुतीत सर्व काही आलबेल असल्याचंही आशिष शेलार म्हणाले आहेत. "कुठलाही मतभेद नाही. निवडून कोण येईल हा मुद्दा आहे. उमेदवारांच्या संदर्भात आम्ही एकमेकांना मदत करू. काँग्रेस 90 पर्यंत आलं, सेनेसमोर झुकलं. आज भाजपची दुसरी यादी येईल," असं त्यांनी सांगितलं. आम्ही नवाब मलिक यांचं काम करणार नाही. देवेंद्र फडणवीस भूमिका मांडतील अशसं आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं.

 

#garjahindustannews#garjahindustannews#garjahindustan#MaharashtraVidhanSabhaElection2024#MaharashtraVidhanSabha#ElectionResult2024#MaharashtraElectionResults2024

Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | GARJA HINDUSTAN | GARJA HINDUSTAN NEWS | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | GARJA HINDUSTAN NEWS LIVE | Mumbai local train update | Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics

मागे

शरद पवार यांचा आजपर्यंतचा सर्वात मोठा राजकीय प्लान;20 तरुण उमेदवारांची यादीच केली जाहीर
शरद पवार यांचा आजपर्यंतचा सर्वात मोठा राजकीय प्लान;20 तरुण उमेदवारांची यादीच केली जाहीर

Maharashtra Politics : शरद पवार 20 युवकांना संधी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दाद....

अधिक वाचा

पुढे  

ठाकरेंच्या कठोर निर्णयानंतर 'लालबागचा राजा'च्या चरणी सापडलेली 'ती' चिठ्ठी पुन्हा चर्चेत
ठाकरेंच्या कठोर निर्णयानंतर 'लालबागचा राजा'च्या चरणी सापडलेली 'ती' चिठ्ठी पुन्हा चर्चेत

जागावाटपाचा तिढा सुटत आहे त्याप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून उमेदवार....

Read more