By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 03, 2019 12:29 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच शपथ घेतलेल्या मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर करण्याची शक्यता आहे. दोन-तीन दिवसात खातेवाटप जाहीर करू असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारल्यावर सांगितलं होतं. त्याप्रमाणे आज खातेवाटपाला मूहुर्त मिळण्याची शक्यता आहे.
कालच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिल्लीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली होती. त्यावेळी खातेवाटपसंदर्भात चर्चा झाल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत अंतिम निर्णय येण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.
उद्धव ठाकरे यांचा शपथविधी झाला तेव्हा सहा जणांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली होती. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तीनही पक्षाचे प्रत्येकी २ जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली होती, यात आता कुणाला कोणतं खातं दिलं जातं याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे....
अधिक वाचा