ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

उद्धव ठाकरे यांनी आता बिगर भाजपशासित राज्याचं नेतृत्व करावं : संजय राऊत

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 28, 2020 10:27 AM 2019-02-12T14:15:30+5:30

उद्धव ठाकरे यांनी आता बिगर भाजपशासित राज्याचं नेतृत्व करावं : संजय राऊत

शहर : मुंबई

शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी नाराजीतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. यावरुन पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये कुरबुर असल्याची चर्चा रंगू लागली. याविषयी संजय राऊत म्हणाले की, "तीन पक्षांचे सरकार असताना थोडी नाराजी असतेच. संजय जाधव मुंबईत आलेले आहेत, यातून मार्ग निघेल. महाविकास आघाडी सरकारमध्ये उत्तम मन्वय आहे. जी समन्वय समिती आहे ती मंत्रालय कामकाजासाठी आहे. तिन्ही पक्षांना समन्वय समितीची गरज नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. परंतु गरज पडल्यास पुन्हा विचार करु."

केंद्राने निधी गोठवल्यामुळे आमदार-खासदारांची नाराजी

मागील काही दिवसात निधी वाटपावरुन काँग्रेस आमदार नाराज असल्याचं समोर आलं होतं. याबाबत संजय राऊत यांनी केंद्र सरकारवरच निशाणा साधला. "तीन पक्षाचं सरकार असताना निधी वाटपास आमदार आणि खासदारांची नाराजी आहे. पण केंद्राने निधी गोठवल्यामुळे अडचण आहे," असं संजय राऊत म्हणाले.निधी वाटपात दुजाभाव करत असल्याचा आरोप करत जालन्याचे 11 आमदारांनी उपोषणाचा इशारा दिला होता. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार कैलास गोरंट्याल यांच्याशी फोनवरुन संवाद साधला आणि निधी वाटपात दुजाभाव केला जाणार नाही असं आश्वासन दिलं. त्यानंतर हे उपोषण रद्द करण्यात आलं.

राहुल गांधी सक्षम आहेत : संजय राऊत 

23 नेत्यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रावरुन दोन दिवसांपूर्वी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठक वादळी ठरली. याविषयी संजय राऊत म्हणाले की, "काँग्रेसमध्ये जे काय घडलं त्यावर काँग्रेसनेच बोललं पाहिजे. काँग्रेस मोठा पक्ष आहे, विरोधी पक्ष आहे. देशाला मजबूत विरोधी पक्षाची गरज आहे. काँग्रेस पक्षाने या वादळातून सावरावं आणि जमिनीवर काम करावं. "तसंच संपूर्ण देशात ज्यांच्या नेतृत्त्वात कार्यकर्ते काम करतील ते राहुल गांधीच आहेत. ते सक्षम आहेत," असंही संजय राऊत म्हणाले.

 

मागे

... तर कलेक्टर ऑफिससमोर कोरोना रुग्णांचे मृतदेह घेऊन बसू, खासदार संजय पाटलांचा इशारा
... तर कलेक्टर ऑफिससमोर कोरोना रुग्णांचे मृतदेह घेऊन बसू, खासदार संजय पाटलांचा इशारा

सांगली जिल्ह्यातील कोरोना स्थितीवरून भाजपा खासदार संजयकाका पाटील प्रशासन....

अधिक वाचा

पुढे  

ज्याने गांजा घेतल्याचं म्हटलं जातं, त्या अभिनेत्याच्या आत्महत्येची चर्चा, पण … : राजू शेट्टी
ज्याने गांजा घेतल्याचं म्हटलं जातं, त्या अभिनेत्याच्या आत्महत्येची चर्चा, पण … : राजू शेट्टी

“एक अभिनेता ज्याने गांजा घेतल्याचं म्हटलं जातं, त्या अभिनेत्याच्या आत्मह....

Read more