By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 22, 2020 05:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई - महाराष्ट्रात ठाकरे सरकार स्थिरस्थावर होत आहे. उद्धव ठाकरें यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन आता ५५ दिवस झाले आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर उद्धव ठाकरे पुन्हा अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा संजय राऊतांनी केली. “सरकार जोरात कामास लागले आहे. पाच वर्षे पूर्ण करणारच! प्रभू श्रीरामाची कृपा. सरकारला शंभर दिवस पूर्ण होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येस जातील. श्रीरामाचे दर्शन घेऊन पुढील कार्याची दिशा ठरवतील”, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मागच्या वर्षी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २४ नोव्हेंबर २०१८ रोजी श्रीरामाच्या दर्शनाला अयोध्येत जाण्याची घोषणा केली होती. मात्र महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची धामधूम, सत्तास्थापनेचं नाट्य या सर्व घडामोडिंमुळे हा दौरा रखडला. तो आता पुन्हा आखण्यात येत आहे.
मुंबई - येत्या २६ जानेवारीपासून राज्यात १० रुपयात थाळीच....
अधिक वाचा