By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 12, 2019 11:34 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
पुणे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज शिवनेरी किल्ल्यावर आणि एकवीरा देवीच्या दर्शनासाठी जाणार असून हा त्याचा पहिलाच दौरा असेल. शिवनेरी हे शिवरायांचे जन्मस्थळ असून या ठिकाणी उद्धव ठाकरे राज्यातील जनतेच्या दृष्टीने एखाद्या मोठ्या योजनेची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आधी एकवीरेचे दर्शन घेणार असून त्यानंतर शिवनेरी गडावर जाणार आहेत. ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान राज्यातील सत्तास्थापनेनंतर शिवनेरीला जाणार असल्याचे म्हटले होते. सत्तास्थापनेच्या घडामोडींदरम्यान, शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यावर मी स्वत: शिवनेरीवर जाणार, तसेच, कुलदैवत एकवीरेचेही दर्शन घेईन, असेही ठाकरे म्हणाले होते. त्यानुसार ते हा दौरा करीत आहेत. सध्या महाविकास आघाडी सरकार शेतकरी कर्जमाफीबाबत कधी घोषणा करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन आसामच्या गुवहाटी आणि ईशान्येकड....
अधिक वाचा