ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोचिंग क्लास पुन्हा सुरु करा, कोचिंग क्लासेसचं शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 02, 2020 10:38 AM 2019-02-12T14:15:30+5:30

कोचिंग क्लास पुन्हा सुरु करा, कोचिंग क्लासेसचं शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला

शहर : मुंबई

राज्यातील ग्रंथालय सुरु झाल्यानंतर आता कोचिंग क्लास पुन्हा सुरु करण्यासाठी मालक चांगलेच आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पालक संघासह कोचिंग क्लासेसच्या पालक आणि शिक्षकांचे शिष्टमंडळ मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. कोचिंग क्लासेसच्या सर्व मागण्या राज ठाकरेंनी सरकार दरबारी मांडाव्या यासाठीही भेट घेणार आहेत.

राज्यात कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अकरावीसह इतर इयत्तांचे प्रवेश रखडले आहेत. तर दुसरीकडे आर्थिक परिस्थितीमुळे कोचिंग क्लास मालकांचे कंबरडे मोडले आहे. या पार्श्वभूमीवर आज पालक संघ आणि कोचिंग क्लासेस मालक – शिक्षकांचे शिष्टमंडळ राज ठाकरेंची भेट घेणार आहे. राज ठाकरेंच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर ही भेट होणार आहे.

यावेळी कोचिंग क्लासचे शिष्टमंडळ त्यांच्या काही मागण्या राज ठाकरेंकडे मांडणार आहेत. या मागण्या सरकार दरबारी मांडण्यासाठी हे शिष्टमंडळ राज ठाकरेंकडे विनंती करणार आहेत.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अनलॉक सुरु आहे. त्यानंतर डॉक्टर, कोळी महिला, जिम मालक-चालक, हॉटेल व्यावसायिक, मुंबईचे डबेवाले यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. यावेळी या सर्वांनी राज ठाकरेंकडे विविध मागण्यांचं साकडं घातलं होतं. यानंतर काही समस्यांवर तोडगाही निघाला होता. त्यामुळे अनेकांना विश्वास वाटत आहे.

राज ठाकरेंना आतापर्यंत कोण कोण भेटलं?

मूर्तीकार

डबेवाले

जिमचालक

कोळी महिला

वीजबिल ग्राहक

पुजारी

डॉक्टरांचे शिष्टमंडळ

‘अदानी’चे अधिकारी राज ठाकरेंच्या भेटीला!

मागे

ताकद दाखवण्यास सुरुवात, भाजपच्या बैठकीपेक्षा खडसेंच्या सत्काराला गर्दी
ताकद दाखवण्यास सुरुवात, भाजपच्या बैठकीपेक्षा खडसेंच्या सत्काराला गर्दी

भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे य....

अधिक वाचा

पुढे  

एसटी कामगारांना काम करायला नेलं होतं की मरायला?', निलेश राणेंचा सरकारला संतप्त सवाल
एसटी कामगारांना काम करायला नेलं होतं की मरायला?', निलेश राणेंचा सरकारला संतप्त सवाल

एसटी कामगारांना काम करायला नेलं होतं की मरायला? अशा शब्दात माजी खासदार निले....

Read more