By Anuj Kesarkar | प्रकाशित: ऑक्टोबर 18, 2019 12:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई शहर जिल्ह्यात कुलाबा विधानसभा क्षेत्रातील झवेरी बाजार भागात काल रात्री बाराच्या सुमारास 187 कुलाबा विधानसभा निवडणूक संबंधातील दक्षिण प्रादेशिक विभागाचे सहा. पोलीस निरीक्षक सुहास माने व त्यांच्या सहकाऱ्यांनी 5 व्यक्तींकडून 2 कोटी 19 लाख 50 हजार रुपये इतकी संशयीत रक्कम जप्त केली.
मोक्ष दुग्धालय पहिली अग्यारी लेन खारा कुआ झवेरी बाजार येथे सागर रमेश आजगावकर 60 लाख रुपये , रमेश अशोक जैन 40 लाख, जेटू लक्ष्मण सिंग 30 लाख रु., इम्रान सय्यद कादरी 39 लाख 50 हजार रु. तसेच विठ्ठल काशीनाथ यादव व संजय मळेकर यांचेकडून 50 लाख रु. अशी एकुण 2 कोटी 19 लाख 50 हजार रुपये जप्त केले. आयकर विभाग मुंबईचे निरीक्षक रितेश कुमार व दिलीप मदन हे आयकर संदर्भात पुढील तपास करीत आहेत. लोकमान्य टिळक मार्ग पोलीस स्टेशन येथे याची नोंद करण्यात आली आहे.
भाजपकडून मोठा गाजावाजा करण्यात आलेले विकासाचे डबल इंजिन मॉडेल महाराष्ट्र....
अधिक वाचा