By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 24, 2020 02:56 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई : वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सीएए आणि एनआरसी विरोधात पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला राज्यात समिश्र प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसत होते. मुंबईत या बंदचा फारसा परिणाम जाणवला नाही. मात्र बंद च्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे रस्ता, रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू होती. मुंबईत ९९ टक्के बसेस रस्त्यावर धावत होत्या.
सातारा आणि औरंगाबादमध्ये महाराष्ट्र बंदचे पडसाद दिसले. सातार्यात तर सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर शाळा-महविद्यालयांना सुट्टी देण्यात आल्याने तीही बंद होती. रिक्षा व बस सेवाही ठप्प होती. पोलिसांचा बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.
प्रकाश आंबेडकर यांचा गड असलेल्या अकोला जिल्ह्यातही बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला. मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधी रोड, टिळक रोडवरील प्रतिष्ठाने बंद आहेत. नाशिकमध्येही सर्व व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू होते. तर नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीवरही कोणताच परिणाम जाणवला नाही. राज्यातून बाजारात भाजीपाल्याची आवक नेहमीप्रमाणे सुरू आहे. उलट आवक वाढल्याने भाज्यांचे दर स्थिर आहेत.
प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला ३५ संघटनांनी पाठिंबा दर्शविला होता. मात्र अनेक ठिकाणी या बंदला हिंसक वळण लागल्याचे वृत्त होते. दरम्यान हा बंद म्हणजे कर्फ्यू नव्हे. आम्ही जनतेला कैद केले नाही. एनआरसी आणि सीएएचा मुद्दा जनतेपर्यंत पोहोचविण्याचा आमचा उद्देश आहे, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे.
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा माजी केंद्रीयमं....
अधिक वाचा