By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 11, 2019 06:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राष्ट्रवादीकडून शिवसेनेला पाठिंबा देण्याचा काँग्रेसच्या निर्णयावर जाहीर केला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी आपला पाठिंबा देणार हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, शिवसेना नेते थोड्याच वेळात राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या भेटीत शिवसेनेकडून सत्तास्थापनेचा दावा केला जाऊ शकतो.शिवसेना नेते काँग्रेस, राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याने राज्यपालांच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्यात फोनवरून चर्चा झाली. यानंतर सोनिया गांधी यांनी प्रत्येक आमदारांशी फोनवरून चर्चा केली आहे. त्यानंतर शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यात सध्या सत्ता स्थापनेचा घोळ सुरू आहे. राज्याला पूर्णवेळ मुख्यमंत्री ....
अधिक वाचा