ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अखेर काँग्रेसकडून खातेवाटप जाहीर

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 04, 2020 06:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अखेर काँग्रेसकडून खातेवाटप जाहीर

शहर : मुंबई

       मुंबई - ठाकरे सरकारच्या बहुचर्चित खातेवाटपाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. काँग्रेस पक्षाकडून शनिवारी आपल्या मंत्र्यांची खातेनिहाय यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे आता थोड्याचवेळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही आपापल्या मंत्र्यांची खातेनिहाय यादी प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता आहे. 


         दरम्यान, काँग्रेसकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या खातेवाटपात बाळासाहेब थोरात यांच्याकडे अपेक्षेप्रमाणे महसूल खात्याचा कारभार सोपवण्यात आला आहे. तर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची धुरा सोपविण्यात आली आहे. तर राज्यमंत्री असलेल्या विश्वजित कदम यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याशिवाय, काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे सुपूत्र अमित देशमुख यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक खात्याचा कारभार सोपवण्यात आला आहे. 

 

काँग्रेसची खातेनिहाय यादी पुढीलप्रमाणे:

बाळासाहेब थोरात -महसूल
अशोक चव्हाण- सार्वजनिक बांधकाम
नितीन राऊत- ऊर्जा
विजय वड्डेटीवार- ओबीसी ,खार जमिनी,मदत आणि पुनर्वसन
के.सी.पाडवी- आदिवासी विकास
यशोमती ठाकूर- महिला व बालकल्याण
अमित देशमुख- वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक
सुनील केदार- दुग्ध विकास व पशुसंवर्धन
वर्षा गायकवाड- शालेय शिक्षण
अस्लम शेख- वस्त्रोद्योग,मस्तव्यवसाय, बंदरे
सतेज पाटील- गृह राज्यमंत्री (शहर)
विश्वजित कदम- कृषी आणि सहकार राज्यमंत्री

 

मागे

'असदुद्दीन ओवेसींना क्रेनला उलटे टांगून त्यांची दाढी भादरून टाकेन'
'असदुद्दीन ओवेसींना क्रेनला उलटे टांगून त्यांची दाढी भादरून टाकेन'

     हैदराबाद - नागरिकत्व सुधारणा विधेयकाला (CAA) विरोध करणारे एमआयएम पक्षा....

अधिक वाचा

पुढे  

नाराज भास्कर जाधवांची मंत्री उदय सामंत यांनी घेतली भेट
नाराज भास्कर जाधवांची मंत्री उदय सामंत यांनी घेतली भेट

       रत्नागिरी -  तंत्रशिक्षण आणि राज्यातले नवनियुक्त उच्च मंत्री उ....

Read more