By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 26, 2020 10:58 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
भिवंडी-निजामपूर महानगर पालिकेचे 18 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामिल झाले असून काँग्रेस प्रदेश महासचिव विनायकराव देशमुख यांनी ही बाब अत्यंत गंभीरपणे घेतली आहे. देशमुख यांनी थेट पक्षकार्यकर्त्यांना खुले पत्रं लिहिले असून काँग्रेसने ही घटना गंभीरपणे घेऊन सावध राहावे, असा इशाराही विनायकराव देशमुख यांनी दिला आहे.
भिवंडी-निजामपूर महानगर पालिकेत उपमहापौरासह 18 नगरसेवकांनी बुधवारी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे विनायकराव देशमुख यांनी या घटनेला गांभीर्याने घेतले असून या घटनेवरून पक्ष आणि कार्यकर्त्यांना सावध करणारं खुलं पत्रचं त्यांनी लिहिलं आहे. ही घटना साधी नाही. सावधानतेचा इशारा देणारी ही घटना आहे. नाही तर उद्या परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. केवळ महाविकास आघाडीत सहभागी होऊन मंत्रिपद मिळाल्याने पक्षाने समाधानी राहू नये, असं या पत्रात देशमुख यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस कार्यकर्ते अस्वस्थ
महाविकास आघाडीत शिवसेनेने मुख्यमंत्रीपद मिळवलं आहे. पण राष्ट्रवादीही आक्रमक आहे, असं सांगतानाच राज्यातील काँग्रेस कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नुकतेच शिवसैनिकांशी जुळवून घ्यायला सांगितलं आहे. त्यानंतर काँग्रेस नगरसेवकांना राष्ट्रवादीत सामिल करून घेतले आहे. हा निव्वळ योगायोग नाही, हे लक्षात असू द्या, असंही त्यांनी या पत्रात नमूद केलं आहे.
या आधी नगरमधील पारनेरचे शिवसेनेचे काही नगरसेवक राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत सामिल झाले होते. नंतर ते पुन्हा आपल्या पक्षात परतले होते. मित्र पक्षांच्या नेत्यांना, लोकप्रतिनिधींना पक्षात प्रवेश द्यायचा नाही हे ठरलेलं असताना राष्ट्रवादीने काँग्रेस नगरसेवकांना त्यांच्या पक्षात प्रवेश दिलाच कसा? असा सवालही त्यांनी केला आहे.
… तर काँग्रेसला सर्वाधिक नुकसान
काँग्रैस नगरसेवकांना राष्ट्रवादीत प्रवेश दिल्याबद्दल राज्याच्या समन्वय समितीत राष्ट्रवादीला त्याचा जाब विचारला पाहिजे. नाही तर आघाडीत काँग्रेसला सर्वाधिक नुकसान सोसावं लागेल, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, काँग्रेसचे हे 18 नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार होते, असा दावा शिवसेनेच्या एका नेत्याने केला आहे. आम्ही त्यांना शिवसेनेत प्रवेश देण्यास नकार दिला. त्यामुळे ते राष्ट्रवादीत गेले. त्यांना राष्ट्रवादीनेही पक्षप्रवेश दिला नसता तर ते भाजपमध्ये गेले असते, असा दावाही या शिवसेना नेत्याने केला आहे.
निवडणूक आयोगाने नुकतंच राज्यातील ग्राम पंचायत निवडणुकीचा (Gram Panchayat election qualification) क....
अधिक वाचा