ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पक्षाने आदेश दिल्यास विधानसभा लढवणार- नाना पटोले

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 27, 2019 06:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पक्षाने आदेश दिल्यास विधानसभा लढवणार- नाना पटोले

शहर : नागपूर

येत्या विधानसभा निवडणुकीत लढण्यास तयार असल्याचे संकेत कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी दिले आहेत तसेच राज्यात कॉंग्रेसची जबाबदारी दिल्यास ती देखील स्वीकारण्यास तयार असल्याचे कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी सांगितले. ते नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पक्षाने आदेश दिले होते म्हणून लोकसभा नागपुरातून लढलो. पक्षाने आदेश दिले तर विधानसभा देखील लढण्यास तयार असल्याचे नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान निवडणूक अधिकाऱ्यांनी निष्पक्ष पद्धतीचा अवलंब केल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. यामुळेच माझ्यासह कॉंग्रेस कार्याकर्त्यां गुन्हे दाखल केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या विरुद्ध न्यायालयीन प्रक्रियेनुसार न्यायालयात दाद मागणार असल्याचेही पटोले यांनी सांगितले.तसेच राजकारणातून निवृत्तीचा कुठलाही विचार नसून विरोधक म्हणून जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवू असेही नाना पटोले म्हणाले. तसेच लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल आणि वाढदिवसानिमित्त नाना पटोले यांनी नितीन गडकरी यांना यावेळी शुभेच्छा दिल्या.

मागे

राष्ट्रवादी लागली विधानसभेच्या तयारीला; 1 जूनला प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक
राष्ट्रवादी लागली विधानसभेच्या तयारीला; 1 जूनला प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक

लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या ....

अधिक वाचा

पुढे  

उर्मिलाविषयी सोशल मीडियावर अश्लील विधान करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
उर्मिलाविषयी सोशल मीडियावर अश्लील विधान करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

अभिनय क्षेत्राक़डून राजकीय विश्वाकडे वळलेल्या अभिवेत्री उर्मिला मातोंडक....

Read more