By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 23, 2019 04:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : sehore
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज ( २३ मे ) सकाळपासून सुरुवात झाली. मतमोजणी दरम्यान अनेक उमेदवारांची धाकधूक वाढलेली आहे. या धाकधूकीत मध्यप्रदेशातील काँग्रेसच्या नेत्याचा मात्र दुर्दैवी मृत्यू झाला आहे.रतन सिंह ठाकूर यांचा निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान मृत्यू झाला आहे. ते मध्य प्रदेशच्या काँग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष होते. हार्टअॅटेक आल्याने त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. पंरतु त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.
सीहोर जिल्ह्यातील मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी रतन सिंह उपस्थित होते. या दरम्यान त्यांची अचानक प्रकृती ढासळली. त्यावेळेस जवळ असलेल्या लोकांनी त्यांना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याआधी त्यांचा मृत्यू झाला. रतन सिंह यांच्या अकाळी मृत्यूमुळे मध्यप्रदेश काँग्रेसमध्ये दुखाचं वातावरण आहे.
आंध्र प्रदेश विधानसभा निवडणूक मतदानाच्या निकालाचा आकडा स्पष्ट होताना दिस....
अधिक वाचा