ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मंत्रिपदासाठी काँग्रेस नेत्यांची दिल्लीवारी, 'ही' सात नावं चर्चेत

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 23, 2019 01:39 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मंत्रिपदासाठी काँग्रेस नेत्यांची दिल्लीवारी, 'ही' सात नावं चर्चेत

शहर : मुंबई

           नवी दिल्ली - नागपुरातील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचेच डोळे लागून राहिले आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून कोणकोणत्या नेत्यांची वर्णी लागणार, याबाबत उत्सुकता आहे. त्यातच मंत्रिपदासाठी काँग्रेस नेत्यांनी दिल्लीवारीला सुरुवात केली आहे.


         काँग्रेसचे महाराष्ट्रातील दिग्गज नेते दिल्लीत दाखल झाले असून ते आज पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत वरिष्ठ नेत्यांची दिल्ली दरबारी चर्चा होण्याची चिन्हं आहेत. महसूल मंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण दिल्लीत दाखल झाले आहेत.


          काँग्रेसकडून थोरातांसह नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. आता दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांना वगळून नवोदितांना संधी मिळण्याची शक्यता आहे. मंत्रिपदासाठी विजय वडेट्टीवार, के. सी. पाडवी, सुनील केदार, यशोमती ठाकूर, विश्वजीत कदम, अमित देशमुख, वर्षा गायकवाड या आमदारांची नावं चर्चेत आहेत.


         काँग्रेसकडे  महसूल, ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय (पदुम), सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास, महिला आणि बाल विकास, वस्त्रोद्योग, मदत आणि पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण.


       सध्या महसूल मंत्रालयाची धुरा बाळासाहेब थोरातांकडे असून त्यांच्याकडे हे मंत्रिपद कायम राहण्याचे संकेत आहेत. महिला आणि बाल विकास मंत्रिपदी यशोमती ठाकूर किंवा वर्षा गायकवाड यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम, शालेय शिक्षण यासारखी महत्त्वाची मंत्रालयं कोणाकडे जाणार, याची उत्सुकता आहे.

           मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेकडून सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ, तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत अशा सात मंत्र्यांनी 28 नोव्हेंबर रोजी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर दोन आठवड्यांनी, म्हणजेच 12 डिसेंबरला तात्पुरते खातेवाटप करण्यात आले. आता मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त कधी लागणार, याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.
 

मागे

CAA च्या पाठिंब्यासाठी देशात रॅली, दिल्ली-मुंबई-नागपूरच्या रस्त्यावर हजारो लोक
CAA च्या पाठिंब्यासाठी देशात रॅली, दिल्ली-मुंबई-नागपूरच्या रस्त्यावर हजारो लोक

देशभरात नागरिकत्व कायद्याला  तीव्र विरोध असताना आता भाजप समर्थकांतून रॅ....

अधिक वाचा

पुढे  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना जिल्हा प्रमुखांची बैठक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना जिल्हा प्रमुखांची बैठक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यातील शिवसेने....

Read more