By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 23, 2019 05:40 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. राज्यामध्ये काँग्रेसला फक्त एका जागेवर आघाडी मिळाली आहे. एवढच नाही तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. राज्यातल्या काँग्रेसच्या या खराब कामगिरीनंतर अशोक चव्हाण राजीनामा द्यायची शक्यता आहे. राज्यातल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून अशोक चव्हाण मोठा निर्णय घेऊ शकतात.
२०१४ सालच्या निवडणुकीत काँग्रेसने नांदेड आणि हिंगोली या दोन जागा जिंकल्या होत्या. यावेळी मात्र काँग्रेसला फक्त एकाच जागेवर समाधान मानावं लागणार आहे. ५ महिन्यांमध्येच विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या पराभावाचा कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणूक 2019 मध्ये सत्ताधारी एनडीएला भरघोस यश मिळाले आहे. आतापर्यंत मत....
अधिक वाचा