ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

विधानसभेच्या अध्यक्षपदी नाना पटोलेंची बिनविरोध निवड

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 01, 2019 11:44 AM 2019-02-12T14:15:30+5:30

विधानसभेच्या अध्यक्षपदी नाना पटोलेंची बिनविरोध निवड

शहर : मुंबई

विधानसभेच्या अध्यपदी अखेर नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली आहे. विरोधी पक्ष म्हणून सत्ताधाऱ्यांसमोर उभ्या असणाऱ्या भाजपकडून विधानसभा अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीतून माघार घेतली गेल्यामुळे या निवडणुकीत नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाल्याचं स्पष्ट होत आहे. तेव्हा आता विरोधीपक्षनेत्याची रविवारीच निवड केली जाते का, याकडेही साऱ्यांचं लक्ष असेल.

काँग्रेसकडून साकोलीचे आमदार नाना पटोले यांना अध्यक्षपदासाठीची उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्याविरोधात भाजपकडून किसन कथोरे यांचं आव्हान होतं. पण, सत्ताधारी पक्षाच्या सर्व नेत्य़ांनी आवाहन करत महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांची निवड ही परंपरागत पद्धतीने बिनविरोध व्हावी असं सांगितल्यामुळे, झालेल्या बैठका आणि चर्चांनंतर, अध्यक्षांचं पद वादात आणायचं नसल्याचं म्हणत भाजपकडून कथोरेंचा अर्ज मागे घेत असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.

भाजपच्या या निर्णयाबद्दल सत्ताधाऱ्यांकडूनही त्यांचं कौतुक करण्यात येत आहे. विरोधी पक्षाने आपला उमेदवार देऊन संख्याबळ नसताना कटूता वाढवण्यामुळे त्याचे परिणामही दिसतात. पणविरोधी आणि सत्ताधारी अशा पक्षांना न्याय देण्याचं काम हे विधानसभा अक्ष्यक्षांचं असतं. त्यामुळे अध्यपसाठी आपला उमेदवार न देण्याचा निर्णय घेत भाजपकडून किसन कथोरे यांचा अर्ज मागे घेण्याचा निर्णय हा प्रगल्भ लोकशाहीसाठी चांगला निर्णय असल्याची समाधानकारक प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

विधानसभेच्या अध्यपदी निवड झालेल्या नाना पटोले यांच्याकडून आता पुढील कामकाजासाठी आपण आशावादी असल्याच्या प्रतिक्रिया सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेत्यांनी व्यक्त केल्या आहेत. नाना पटोले यांनी नितीन गडकरींविरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती. एक आक्रमक नेते म्हणून पटोले यांची ओळख आहे. भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ते काँग्रेसमध्ये परतले आणि भाजपविरोधात वेळोवेळी त्यांनी सातत्याने आक्रमक भूमिका धेतल्याचं पाहायला मिळालं. तेव्हा आता अध्यक्षपदी आल्यानंतर नाना पटोले यांच्या कारकिर्दीकडेही सर्वांच्या नजरा असतील.

मागे

महिन्याभर राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षाचा द एण्ड
महिन्याभर राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षाचा द एण्ड

गेल्या महिन्याभर राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षाचा द एण्ड झाला आहे. उद्....

अधिक वाचा

पुढे  

विरोधी पक्षनेतेपदी आजच होणार देवेंद्र फडणवीसांची निवड
विरोधी पक्षनेतेपदी आजच होणार देवेंद्र फडणवीसांची निवड

विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेसच्या नाना पटोले यांची निवड झाल्यानंतर रविवार....

Read more