ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

निकालाआधीच कॉंग्रेस - राष्ट्रवादीत तू तू मै मै सुरु

By Dinesh Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 23, 2019 04:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30

निकालाआधीच कॉंग्रेस - राष्ट्रवादीत तू तू मै मै सुरु

शहर : मुंबई

विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या लागणार आहे. तथापि गेले दोन दिवस राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांच्यात तू तू मै मै सुरु झाल्याचे दिसत आहे. दोन्ही कॉंग्रेसमधील काही बोल घेवड्या नेत्यांमुळे वरिष्ठ नेत्यांची सारवासारव करताना उडणारी तारांबळही चांगलीच करमणूक करीत आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्यसभेचे खासदार मजीद मेनन यांनी कॉंग्रेसवर हल्ला केला. "काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी प्रचारापासून दूर राहिल्या. राहुल गांधींनी तुरळक सभा घेतल्या. " मात्र त्यामध्ये काँग्रेस नेत्यांची वणवा होती. केवळ राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी निवडणूक प्रचारात प्रचंड मेहनत घेतली. काँग्रेस सोयाबीत कायेवल मजबुरी म्हूणन आघाडी केली असे मजीद मेनन यांनी म्हंटले.

त्यावर प्रत्युत्तर देताना काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजन भोसले यांनी "राष्ट्रवादी सारखा मित्र असेल तर शत्रूची गरज नाही" असे म्हंटले. जर शरद पवार सोडले तर राष्ट्रवादीचे अन्य नेते प्रचारात होते का ? राष्ट्रवादीचे अन्य  नेते नसल्याने 80 वर्षीय पवारांना प्रकृती अस्वस्था नंतरही प्रचारात उतरावे लागते असेही भोसले म्हणाले.

दरम्यान या तू तू मै मै प्रकारानंतर दोन्ही पक्षाच्या वरिष्ठांनी डॅमेज कंट्रोलचा  प्रयत्न केला. तसेच वक्तव्य खोडून काढली.

 

मागे

मतदान करुन परतणाऱ्या 95 जणांचा तराफा उलटला
मतदान करुन परतणाऱ्या 95 जणांचा तराफा उलटला

मतदान होऊन दोन दिवस उलटले तरी त्यासाठी आलेल्या अडचणींचा सामना करणाऱ्या मतद....

अधिक वाचा

पुढे  

शिवसेनेशिवाय राज्यात भाजपला पर्याय नाही - संजय राऊत
शिवसेनेशिवाय राज्यात भाजपला पर्याय नाही - संजय राऊत

राज्यात भाजपला शिवसेनेशिवाय पर्याय नसून, शिवसेनेशिवाय ते राज्य करु शकत नाह....

Read more