By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 16, 2020 11:29 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीला एप्रिल महिन्यात मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. पक्षातील अंतर्गत कलहामुळे अध्यक्षपदाची निवड लांबली आहे. काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा पद स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यामुळे प्रियंका गांधी-वढेरा यांचे (Priyanka Gandhi) नाव समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सोनिया गांधी यांनी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला काँग्रेसला नवीन अध्यक्ष मिळण्याची शक्यता गेल्या काही दिवसांपासून वर्तवली जात होती. मात्र अंतर्गत कलहाचा फटका बसल्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर पडण्याची चिन्हं आहेत.
राहुल गांधी खुर्चीसाठी नाखुश
राहुल गांधी यांच्या नावालाच पक्षातून प्रथम पसंती मिळत आहे. परंतु राहुल गांधींनी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारण्यास नापसंती दर्शवली आहे. त्यामुळे प्रियंका गांधी-वढेरा यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. आता प्रियंका पद स्वीकारणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पक्षाच्या पुनर्रचनेबाबत पत्रामुळे वादंग
काँग्रेसच्या एकूण 23 नेत्यांनी ऑगस्ट महिन्यात पक्षाच्या पुनर्रचनेबाबत सोनिया गांधींना पत्र लिहिलं होतं. “काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष हवा. सध्या पक्षाला पूर्ण वेळ देईल अशा नेतृत्त्वाची गरज आहे. त्याने लोकांना भेटावे, कोणताही विषय असेल तर त्या अध्यक्षासोबत चर्चा करत यावी, त्याने पक्ष संघटनाला वेळ द्यावा. भाजपचा वाढता विस्तार आणि तरुणांनी मोदींना दिलेली साथ या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचा जनाधार कमी होत आहे. त्यामुळे तातडीने तळापासून मोठ्या बदलांची आवश्यकता आहे.” अशी भूमिका त्या पत्रात व्यक्त करण्यात आली होती. त्या पत्रावरुन सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर सोनियांकडे अध्यक्षपद
सोनिया गांधी 14 मार्च 1998 पासून 16 डिसेंबर 2017 पर्यंत काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा होत्या. त्यानंतर राहुल गांधी यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. राहुल गांधी यांनी दोन वर्ष अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. मात्र, गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेस नेत्यांच्या आग्रहानंतर सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली.
विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेत सहभागी होताना विरोधी पक्षनेते देवें....
अधिक वाचा