By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 07, 2019 12:26 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा पराभव होईल, असे वक्तव्य संजय निरूपम यांनी केले आहे. तिकीटवाटपाच्या मुद्द्यावरून संजय निरूपम सध्या प्रचंड नाराज आहेत. त्यांनी नुकताच पक्ष सोडण्याचाही इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर निरुपम यांनी पक्षाच्या पराभवाचे भाकीत वर्तविले आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होईल. आपण निवडणुकीत पक्षाचा प्रचार करणार नाही. मल्लिकार्जुन खरगे, ज्योतिरादित्य सिंदीया या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना हद्दपार केल्याशिवाय काँग्रेसचे भले होणार नाही, असेही त्यांनी म्हटले. त्यामुळे आता काँग्रेस पक्ष यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा वाद उफाळून आल्याने काँग्रेसला मुंबईत मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मी एकाचे नाव सुचवले होते. मात्र, पक्षाने त्याचा साधा विचारही केला नाही. पक्षाला माझ्या सेवेची गरज उरलेली दिसत नाही. त्यामुळे आपण निवडणूक प्रचारात सहभागी होणार नाही, असे निरुपम यांनी सांगितले होते.
जम्मू काश्मीर मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर तोंडघशी पडलेल्या इमरान ....
अधिक वाचा