ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

रिकाम्या खुर्च्यांचे फोटो काढणाऱ्या पत्रकारांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 07, 2019 11:49 AM 2019-02-12T14:15:30+5:30

रिकाम्या खुर्च्यांचे फोटो काढणाऱ्या पत्रकारांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण

शहर : arcot

संपूर्ण देशभरात उन्हाचा पारा चढल्यामुळे लोकसभा निवडणुकीचा प्रचार करताना राजकीय पक्षांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच वर्ध्यात झालेल्या सभेत याचा प्रत्यय आला होता. मात्र, भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावूनही सभेचे मैदान अर्धेही भरले नव्हते. यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये वाकयुद्ध पेटले होते. या वादाचा धुरळा खाली नाही बसत तोच आता सोशल मीडियावर एक नवा व्हीडिओ व्हायरल होत आहे. या व्हीडिओत काँग्रेसचे कार्यकर्ते पत्रकारांना मारहाण करताना दिसत आहेत. हा व्हीडिओ तामिळनाडूच्या विरुधुनगर येथील आहे. याठिकाणी काँग्रेसने आयोजित केलेल्या सभेकडे लोकांनी पाठ फिरवली. त्यावेळी काही छायाचित्रकार रिकाम्या खुर्च्यांचे फोटो काढत होते. ही गोष्ट रुचल्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या छायाचित्रकारांना मारहाण करायला सुरुवात केली. या प्रसंगामुळे काँग्रेस पक्ष अडचणीत येण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांच्या नागपूरमध्ये झालेल्या सभेतील गर्दीवरूनही असाच वाद निर्माण झाला होता. काही काँग्रेस नेत्यांनी नागपूरमधील सभेचे फोटो ट्विट केले होते. मात्र, हे फोटो बनावट असल्याचे निष्पन्न झाले होते.

मागे

...तर एफ-१६ विमानातील क्षेपणास्त्राचे अवशेष भारतात कसे सापडले; अमेरिकेला  सितारामन यांचा  सवाल
...तर एफ-१६ विमानातील क्षेपणास्त्राचे अवशेष भारतात कसे सापडले; अमेरिकेला सितारामन यांचा सवाल

पाकिस्तानची सर्व एफ-१६ विमाने सुरक्षित असल्याचा अमेरिकन मासिकाचा दावा कें....

अधिक वाचा

पुढे  

बदलत्या राजकारणाची आधुनिक शैली!
बदलत्या राजकारणाची आधुनिक शैली!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केलेलं भाषण हे अत्यंत अभ्....

Read more