By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मार्च 26, 2019 03:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
सोलापूर : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी एक गौप्यस्फोट केला आहे. मला व मुलगी आमदार प्रणिती शिंदेंना भाजपाने पक्षात येण्याची ऑफर दिली होती, अशी माहिती शिंदेंनी माध्यमांशी बोलताना दिली होती. शिंदे हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यांची लढत बहुजन वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि भाजपाचे डॉ. जयसिद्धेश्वर महाराज यांच्याशी आहे. भाजपाही हुकूमशाही आणण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. या निवडणुकीत लोक भाजपाला थारा देणार नाहीत, अशीही भविष्यवाणी त्यांनी केली आहे. त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावरही टीकास्त्र केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातूकडून संविधानाला गाडण्याचे काम होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला ग....
अधिक वाचा