By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 30, 2019 04:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
चौकीदार चोर है' असे वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देऊन केल्या प्रकरणी अखेर आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागितली आहे. राफेल विमान करार प्रकरणात फेरविचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना राफेल विमान करारप्रकरणात 'चौकीदार चोर है' ही बाब सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केली आहे, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते. त्याविरोधात भाजपा नेत्या मीनाक्षी लेखी यांनी सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती.
राहुल गांधींविरोधात दाखल याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी राहुल गांधी यांच्या दिलगिरी व्यक्त करण्याच्या पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शपथपत्रात विरोधाभासी उल्लेख कसे काय आहेत? तसेच दिलगिरी व्यक्त करण्यासाठी 22 पानांचे शपथपत्र सादर करावे लागते का? अशी विचारणा केली. त्यानंतर राहुल गांधींचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी आपल्या अशिलाच्या वतीने माफी मागितली. चौकीदार चोर है, हे वाक्य मी मी सर्वोच्च न्यायालाच्या न्यायमूर्तीच्या निर्णयाशी चुकीच्या पद्धतीने जोडले. ही माझी चुक आहे, असे अभिषेक मनू सिंघवी यांनी राहुल गांधींच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात सांगितले. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 मे रोजी होणार आहे.
लोकसभेच्या एकूण ५४३ जागांपैकी ३७४ मतदारसंघांमध्ये मतदान 'सुफळ संपूर्ण' ....
अधिक वाचा