ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

योगींच्या 'मोदी की सेना' विधानानं वाद; माजी नौदल प्रमुखांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 02, 2019 07:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30

योगींच्या 'मोदी की सेना' विधानानं वाद; माजी नौदल प्रमुखांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

शहर : lucknow

भारतीय लष्कराला मोदी की सेना म्हणणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. माजी नौदल प्रमुख एल. रामदास यांनी या संदर्भात निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. यातून त्यांनी सैन्याच्या दुरुपयोगाबद्दल चिंता बोलून दाखवली. निवडणूक प्रचारातील सैन्याचा दुरुपयोग रोखावा, अशी मागणी त्यांनी केली. आपल्या भूमिकेला सैन्य दलातील अनेक अधिकाऱ्यांचा पाठिंबा असल्याचंदेखील रामदास यांनी पत्रात नमूद केलं आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये सोमवारी एका जनसभेला संबोधित करताना भारतीय सैन्याचा उल्लेख 'मोदी की सेना' असा केला होता. याची दखल घेत निवडणूक आयोगानं अहवाल मागवला आहे.

रामदास यांनी त्यांच्या पत्रात जैश-ए-मोहम्मदच्या विरोधात करण्यात आलेल्या एअर स्ट्रइकवरुन सुरू असलेल्या राजकारणाबद्दल चिंता व्यक्त केली. यामुळे मतदारांवर प्रभाव पडू शकतो, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर बालाकोटमध्ये करण्यात आलेले हवाई हल्ले आणि त्यानंतर हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुरक्षित घरवापसीवरुन सुरू असलेल्या राजकारणाकडे रामदास यांनी निवडणूक आयोगाचं लक्ष वेधलं.

काही पक्ष निवडणूक रॅली, माध्यमं, सार्वजनिक स्थळांवर नेत्यांच्या सोबतीनं सैन्याचे फोटो वापरुन आपला राजकीय अजेंडा राबवत आहेत, असं रामदास यांनी पत्रात म्हटलं आहे. 'अशा प्रकारची कृती पूर्णपणे चुकीची आहे. यामुळे सुरक्षा दलांच्या मूल्ल्यांवर घाला घातला जात आहे. या सर्व कृती भारतीय संविधानाच्या भावनेच्या विरोधात आहेत,' असंदेखील रामदास यांनी पत्रात म्हटलं आहे. निवडणूक आयोगानं तातडीनं या प्रकरणात लक्ष घालून प्रचारात सैन्याच्या फोटोंचा वापर रोखावा, असं आवाहन त्यांनी केलं. सैन्याच्या राजकीय वापरावरुन काँग्रेस, भाजपानं एकमेकांना लक्ष्य केलं आहे.

मागे

ऑलंम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी कृष्णा पूनिया देणार राजवर्धन राठोड यांना टक्कर
ऑलंम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी कृष्णा पूनिया देणार राजवर्धन राठोड यांना टक्कर

भाजपने लोकसभा २०१९च्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून ऑलंम्पिक खेळाडू राजवर....

अधिक वाचा

पुढे  

देशाचा पंतप्रधान कोण असणार ?, यावर राहुल गांधींनी केले सूचक भाष्य
देशाचा पंतप्रधान कोण असणार ?, यावर राहुल गांधींनी केले सूचक भाष्य

काँग्रसेकडून पंतप्रधान म्हणून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच....

Read more