By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 30, 2019 05:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
आयएनएक्स मीडिया प्रकरणात तुरुंगात असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना दिल्ली उच्च न्यायालयालाकडून अद्यापी दिलासा मिळालेला नाही. सोमवारी हायकोर्टाने चिदंबरम याचा जामीन पुन्हा फेटाळला आहे.चिदंबरम सध्या तिहार तुरूंगात आहेत आणि जामीनाचा अर्ज फेटाळल्यानंतर त्यांना आता परत तुरूंगातच रहावे लागणार आहे.
आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचारप्रकरणी माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांची जामीन याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. कायदा बनवणारे कायदा मोडत आहेत, असे सांगून सीबीआयच्या वकिलांनी जामीन देण्यास विरोध केला. तर चिदंबरम यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल यांनी या गुन्ह्याचे स्वरूप फार गंभीर नाही. त्यामुळे त्यांना जामीन देण्याची विनंती केली.
निवडणुकीच्या तोंडावर अनेक पक्षांमध्ये आवक जावक चालू आहे. त्यातच एक नाव श्र....
अधिक वाचा