By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 24, 2020 06:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीची (CWC) आज महत्त्वाची बैठक झाली (CWC Meeting). काँग्रेस पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. ही बैठक सकाळी 11 वाजता पार सुरु झाली . या बैठकीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, नारायण स्वामी, भुपेश बघेल, कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.या बैठकीपूर्वी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी सोनिया गांधी यांनी पक्षाची धुरा आपल्या हातात घ्यावी अशी इच्छा व्यक्त केली. तर काहींनी राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्ष पद सोपवण्यात यावं अशी मागणी केली. मात्र, बैठकीत सोनिया गांधी पत्र लिहिणाऱ्या 23 नेत्यांबाबत नाराजी व्यक्त करत पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर एकमताने राहुल गांधी यांना पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
Sonia Gandhi to remain Congress party's interim president for now, new chief to be elected within next 6 months. Congress Working Committee (CWC) meeting has concluded after 7 hours: Sources
— ANI (@ANI) August 24, 2020
पक्षाच्या पुनर्रचनेबाबत नेत्यांचं सोनिया गांधींना पत्र
काँग्रेसच्या 23 नेत्यांनी पक्षाच्या पुनर्रचनेबाबत सोनिया गांधी यांना पत्र पाठवले आहे. यामध्ये महाराष्ट्राचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचादेखील समावेश आहे.
काँग्रेसमध्ये अद्याप सोनिया गांधी यांच्या जागेवर कुणाला घेण्यात यावं याबाबत संभ्रम आहे. पत्रावर स्वाक्षरी केलेल्या काही नेत्यांच्या मते ते पत्रात लिहिलेल्या सर्व बाबींशी सहमत नाहीत. तरी, या पत्रातून त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहे, ज्यावर विचार व्हायला हवा. मात्र, काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी काँग्रेस परिवाराबाहेरील अध्यक्ष निवडण्यास विरोध दर्शवला आहे.
अशोक गहलोत, कॅप्टन अमरिंदर सिंह, संजय निरुपम आणि डीके शिवकुमार सारख्या काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी मात्र सोनिया गांधी यांच्या नेतृत्त्वाला योग्य म्हटलं आहे.
सोनिया गांधी 14 मार्च 1998 पासून 16 डिसेंबर 2017 पर्यंत काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा होत्या. त्यानंतर राहुल गांधी यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. राहुल गांधी यांनी दोन वर्ष अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. मात्र, गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेस नेत्यांच्या आग्रहानंतर सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली.
काँग्रेसच्या नेतृत्त्वावरून सुरु असलेल्या राजकीय घुसळणीमुळे आता महाराष्....
अधिक वाचा