ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

काँग्रेस पक्षाच्या कार्यकारणीची आज बैठक, धुरा कोणाच्या हातात? काँग्रेस नेत्यांचं मत काय?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 24, 2020 08:29 AM 2019-02-12T14:15:30+5:30

काँग्रेस पक्षाच्या कार्यकारणीची आज बैठक, धुरा कोणाच्या हातात? काँग्रेस नेत्यांचं मत काय?

शहर : देश

काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी या त्यांच्या पदाचा राजीमाना देणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा नेतृत्व बदलाची मागणी जोर धरु लागली आहे. आज काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीची (CWC) महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी सोनिया गांधी यांनी पक्षाची धुरा आपल्या हातात घ्यावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. तर काहींनी राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्ष पद सोपवण्यात यावं अशी मागणी केली आहे.

काँग्रेस पक्षाची CWC ची बैठक आज अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. बैठकीत नवीन अध्यक्ष नियुक्तीवर चर्चा होणार आहे. ही बैठक सकाळी 11 वाजता पार पडणार आहे.

पक्षाच्या पुनर्रचनेबाबत नेत्यांचं सोनिया गांधींना पत्र

काँग्रेसच्या 23 नेत्यांनी पक्षाच्या पुनर्रचनेबाबत सोनिया गांधी यांना पत्र पाठवले आहे. यामध्ये महाराष्ट्राचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचादेखील समावेश आहे.

काँग्रेसमध्ये अद्याप सोनिया गांधी यांच्या जागेवर कुणाला घेण्यात यावं याबाबत संभ्रम आहे. पत्रावर स्वाक्षरी केलेल्या काही नेत्यांच्या मते ते पत्रात लिहिलेल्या सर्व बाबींशी सहमत नाहीत. तरी, या पत्रातून त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहे, ज्यावर विचार व्हायला हवा. मात्र, काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी काँग्रेस परिवाराबाहेरील अध्यक्ष निवडण्यास विरोध दर्शवला आहे.

दिल्ली काँग्रेसकडून प्रस्तावास मंजुरी

दिल्ली प्रदेश काँग्रेसने रविवारी एक आपत्कालीन बैठक बोलावली. यामध्ये राहुल गांधी यांनी पक्षाचा अध्यक्ष बनवण्यासाठी एक प्रस्ताव मंजुर करण्यात आला. राहुल गांधींना कॉंग्रेसचे अध्यक्षपद द्यावे, अशी मागणी डीपीसीसी अध्यक्ष अनिल कुमार यांनी केली.

पक्षाचे नेतृत्व गांधी घराण्याकडे असेल तर भाजपविरोधात लढता येईल : सुनिल केदार

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे मी मनापासून समर्थन करतो. गांधी घराण्याच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या मुकूल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण आणि मिलिंद देवरा यांना लाज वाटली पाहिजे. त्यांनी तातडीने याबद्दल सोनिया गांधीची माफी मागितली पाहिजे,” असे ट्विट महाराष्ट्रातील दुग्धविकासमंत्री आणि काँग्रेस नेते सुनील केदार यांनी केलं आहे.

त्यासोबतच “जर त्यांनी सोनिया गांधींची माफी मागितली नाही, तर त्यांना राज्यात काँग्रेस कार्यकर्ते कुठेही फिरकू देणार नाहीत,” अशा इशारा त्यांनी या नेत्यांना दिला आहे.

तसेच “जर पक्षाचे नेतृत्व गांधी घराण्याकडे असेल तर भाजपविरोधात लढता येईल. त्यामुळे सोनिया गांधींच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची हीच वेळ आहे,” असेही सुनिल केदार म्हणाले. सुनील केदार यांच्या ट्विटनंतर महाराष्ट्र काँग्रेसमधील अंतर्गत वाद समोर आले आहेत.

कम बॅक राहुलजी

महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी देखील पत्राच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी अध्यक्ष पद सांभाळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. “राहुलजींनी आता कॉंग्रेसचे नेतृत्व केले पाहिजे. त्यांच्या भावनांचा सन्मान करत, ‘कम बॅक राहुलजी असे आम्ही म्हणू इच्छितो. जोपर्यंत ते पूर्णवेळ अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारत नाहीत, तोपर्यंत अंतरिम अध्यक्ष म्हणून सोनियाजींनी कॉंग्रेसचे नेतृत्व केले पाहिजे, असं ट्विट बाळासाहेब थोरात यांनी केलं.

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी लढण्यासाठी अध्यक्षपद राहुल गांधी यांना मिळावेआसामचे काँग्रेस अध्यक्ष रिपून बोरा यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून राहुल गांधींना कॉंग्रेस अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्याची विनंती केली. जेणेकरुन ते पक्षाचे नेतृत्व करु शकतील आणि भाजप आणि आरएसएसमोर लढा देऊ शकतील.

सचिन पायलट काय म्हणाले?

सचिन पायलट यांनी देखील याबाबत ट्विट करत त्यांचं मत व्यक्त केलं. “श्रीमती गांधी आणि राहुलजी यांनी दाखवून दिलं आहे की लोकांसाठी आणि पक्षासाठी बलिदान करण्याचा काय अर्थ असतो. आता एकमत करण्याची आणि एकत्र येण्याची वेळ आहे. जेव्हा आपण एकत्र येऊ, तेव्हा आपलं भविष्य अधिक मजबूत होईल. बहुतेक कॉंग्रेस कार्यकर्त्यांना राहुलजी पक्षाचे नेतृत्व करताना हवे आहेत.

अशोक गहलोत, कॅप्टन अमरिंदर सिंह, संजय निरुपम आणि डीके शिवकुमार सारख्या काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी मात्र सोनिया गांधी यांच्या नेतृत्त्वाला योग्य म्हटलं आहे.

सोनिया गांधी 14 मार्च 1998 पासून 16 डिसेंबर 2017 पर्यंत काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा होत्या. त्यानंतर राहुल गांधी यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. राहुल गांधी यांनी दोन वर्ष अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. मात्र, गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेस नेत्यांच्या आग्रहानंतर सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली.

मागे

२३ नेत्यांच्या लेटर बॉम्बनंतर काँग्रेसमध्ये वेगवान घडामोडी, सोनिया गांधी राजीनाम्याच्या तयारीत
२३ नेत्यांच्या लेटर बॉम्बनंतर काँग्रेसमध्ये वेगवान घडामोडी, सोनिया गांधी राजीनाम्याच्या तयारीत

काँग्रेस पक्षात नेतृत्वावरून सुरू असलेल्या घडामोडींमध्येच आता सोनिया गां....

अधिक वाचा

पुढे  

मला अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा- सोनिया गांधी
मला अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा- सोनिया गांधी

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोमवारी अपेक्षेप्रमाणे प....

Read more