By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 16, 2019 07:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
अमेरिकेतल्या न्यू जर्सीचे राज्यपाल फिलीप डी. मर्फी यांनी आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मर्फी यांचा हा पहिलाच अधिकृत भारत दौरा आहे. राज्यपाल मर्फी यांच्या दौऱ्यात दिल्लीसोबतच आग्रा, मुंबई, हैदराबाद आणि अहमदाबाद या शहरांचाही समावेश आहे.
न्यू जर्सी आणि भारत यांच्यातील व्यावसायिक संबंधांना तसेच नागरिकांमधील संबंधांना चालना देण्याच्या राज्यपालांच्या इच्छेचे मोदी यांनी स्वागत केले आणि भारतातील राज्यांसोबत अर्थपूर्ण सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी भारत सरकारच्या पाठिंब्याबाबत ग्वाही दिली.
आपले राज्य भारतासोबत संबंध दृढ करण्याला प्राधान्य देत असल्याचे सांगून मर्फी यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातली भागीदारी अधिक वृद्धिंगत करण्यासाठी काम करण्याबाबत प्रतिबद्धता दर्शवली.
वैविध्यतेचा आदर करण्याच्या भारतीच वृत्तीची प्रचिती आपल्याला भारतातील आगमनापासून वेळोवेळी येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
अमेरिकेत, भारतीय-अमेरिकी लोकसंख्येचे सर्वाधिक प्रमाण न्यू जर्सी राज्यात असून भारताच्या व्यापार आणि गुंतवणुकीसाठी ते अमेरिकेतले अग्रणी राज्य असल्याबद्दल मोदी यांनी समाधान व्यक्त केले. उच्च शिक्षणातील सहकार्याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली.
न्यू जर्सीमध्ये भारतीय अमेरिकी समुदायाच्या कल्याणासाठी राज्यपाल जातीने लक्ष पुरवत असल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले.
वस्तू आणि सेवा कर कायद्यांतर्गत तीन टप्प्यात वस्तूंचे दर कमी करण्यात आले. य....
अधिक वाचा