ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

रात्री सव्वादोन वाजता मोदी म्हणाले,“दादा बिटिया गिरनी चाहिए”

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 16, 2019 01:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30

रात्री सव्वादोन वाजता मोदी म्हणाले,“दादा बिटिया गिरनी चाहिए”

शहर : सातारा

महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी साताऱ्यातील वाईच्या सभेत, दिल्लीतील भाजप कार्यालयातील बैठकीतला एक किस्सा सांगितला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील या बैठकीला उपस्थित होते. याबैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. चंद्रकांतदादा रात्री सव्वा दोनला एका मिटिंगमधून बाहेर पडत होते. हा किस्सा सांगताना चंद्रकांत पाटील म्हणतात,  'बैठकीतून बाहेर पडताना, मला मोदींना हाक दिली, दादा इधर आओ', माझे आणि मोदींचे फार जवळचे संबंध आहेत. माझ्याकडे १३ वर्ष गुजरात होतं. आम्ही एकत्र काम केलंय, हे अनेकांना माहित आहे. मोदी मला म्हणाले, 'दादा इधर आओ... देवेन  को बुलाओ'.रात्रीचे सव्वादोन वाजले आहेत, मोदी जवळ आले आणि म्हणाले, 'दादा बिटीया गिरनी चाहिए...!' त्यावर आम्ही दोन्ही जणांनी उत्तर दिलं, 'हा करेंगे करेंगे!'  'बिटीया गिरनी चाहिए' म्हणजे काय? तर शरद पवारांची मुलगी पडली पाहिजे, हे रात्री सव्वादोन वाजता मोदींनी बैठकी बाहेर पडताना आपल्याला म्हटल्याचं चंद्रकांतदादा यांनी वाईच्या सभेत बोलताना सांगितलं.

बाळासाहेबांची तेव्हाची 'मुलगी' आणि 'कमळी'

राजकारणात प्रत्येकाचे दिवस कसे बदलतात हे देखील या पूर्वीच्या एका घटनेवरून लक्षात येईल. चंद्रकांतदादा यांनी या सभेतील एक राजकीय किस्सा सांगितल्यानंतर, आणखी एक आठवणीतला किस्सा समोर येत आहे. ज्या बिटीयाचा राजकीय प्रवेश हा बिनविरोध झाला. त्या सुप्रिया सुळे राज्यसभेत बिनविरोध निवडून आल्या. त्या बिटियाविरोधात पहिल्यांदाच एवढी उघड भूमिका भाजपाने घेतल्यानंतर हा किस्सा देखील ऐकण्यासारखा आहे.

'तुम्ही कमळीची काळजी करु नका'

कारण पुण्यात राज ठाकरे यांनी शरद पवारांची जी मुलाखत घेतली होती, त्यात शरद पवार म्हणाले होते, बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर व्यासपीठावर माझा उल्लेख काय केला? यावर मी काही बोलत नाही, मात्र त्यांनी व्यक्तीगत सलोखा कधीच सोडला नाही, असे पवारांनी बाळासाहेबांबद्दल म्हटलं होतं. पवार म्हणाले होते, 'सुप्रियाला राज्यसभेची उमेदवारी द्यायचे ठरले तेव्हा बाळासाहेबांनी मला फोन केला. मी त्यांची भूमिका विचारली.'बाळासाहेब म्हणाले, "आमची मुलगी निवडणूक लढविणार असताना माझी वेगळी भूमिका काय असेल."मी त्यावेळी त्यांच्या मित्रपक्षाच्या भूमिकेबद्दल विचारलं. तेव्हा ते म्हणाले, "तुम्ही कमळीची काळजी करु नका. सुप्रिया बिनविरोध निवडून येईल आणि खरोखरच सुप्रिया बिनविरोध निवडून आली", असं शरद पवार यांनी त्यावेळी सांगितलं होतं.

मात्र आता परिस्थिती बदललीय, त्या 'बिटिया'चा पराभव करण्यासाठी आता दिल्लीतून बजावलं जातंय...!

मागे

‘कर्ता’ आणि ‘करविता’ एकत्र येणे स्वाभविक; भाजपाचा शरद पवार- राज ठाकरे यांना टोला
‘कर्ता’ आणि ‘करविता’ एकत्र येणे स्वाभविक; भाजपाचा शरद पवार- राज ठाकरे यांना टोला

सोलापूर येथे झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी मोदीवर टीका करण्याची एकही संधी ....

अधिक वाचा

पुढे  

संरक्षण मंत्र्यांच्या भेटीन शशी थरुर भावूक
संरक्षण मंत्र्यांच्या भेटीन शशी थरुर भावूक

आज सकाळी रुग्णालयात जाऊन संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी काँग्रेसचे ....

Read more