ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

निवडणूक कर्तव्यावरील शिक्षकाचा गडचिरोलीत मृत्यू

By Dinesh Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 21, 2019 01:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30

निवडणूक कर्तव्यावरील शिक्षकाचा गडचिरोलीत मृत्यू

शहर : मुंबई

निवडणूक कर्तव्यावरील शिक्षकाचा भोवळ येऊन पडल्याने मृत्यु झाला आहे. एटापल्ली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक बापू पांडु गावडे, (वय 45वर्ष) हे निवडणूक कर्तव्यावर पायी चालून जात असतांना भोवळ येऊन पडले. त्यांचा चंद्रपुर येथे उपचारा दरम्यान मृत्यु झाला. बापू गावडे यांना फिट्सचा आजार होता.

विधानसभा निवडणूकीसाठी एटापल्ली तालुक्यातील पुरसलगोंदी येथील बुथवर ते तैनात होते. मतदान केंद्र पथक हेडरी बेस कॅम्पवरून पुरसलगोंदी केंद्राकडे पायी जात असतांना गावडे हे भोवळ येऊन पडले. त्यांना डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले.

माञ प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना प्रथम अहेरी आणि तेथून चंद्रपुर येथे हलविण्यात आले. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. यापूर्वीही जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या कर्तव्यावरील एका शिक्षकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यु झाला होता.

मागे

मनोहर जोशींनी दिला शिवसेना-भाजपला घरचा अहेर
मनोहर जोशींनी दिला शिवसेना-भाजपला घरचा अहेर

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी भाज....

अधिक वाचा

पुढे  

40 मिनिटे भाषण करु शकता, मग चक्कर कशी येते? - शरद पवार
40 मिनिटे भाषण करु शकता, मग चक्कर कशी येते? - शरद पवार

राज्यभरात सर्वत्र मतदानाचा उत्साह दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे न....

Read more