ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची कर्ज माफी; राज्य सरकारची मोठी घोषणा

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 21, 2019 05:20 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची कर्ज माफी; राज्य सरकारची मोठी घोषणा

शहर : नागपूर

               नागपूर -  महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केली. ही कर्जमाफी सरसकट असणार असून कोणत्याही अटी शर्थी लागू नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.


             महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्तारुढ झाल्यानंतर शेतकरी कर्जमाफी घोषणेची प्रतिक्षा राज्यातील शेतकऱ्यांना होती. आज विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी 'महात्मा फुले कर्जमाफी' योजनेतंर्गत कर्जमाफीची घोषणा केली. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार आहे. शेतकऱ्यांची ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतची कर्जे माफ होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. 


          मार्च महिन्यांपासून कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होणार आहे. दोन महिने प्रशासकीय कामांसाठी लागणार असल्यामुळे मार्च महिन्यांपासून ही कर्जमाफी योजना सुरू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार दिलासा देणार असून त्यांच्यासाठीच्या योजनेची घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.  

          
           कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जाणार आहेत. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांना बँकेच्या, सरकारी कार्यालयात रांगेत उभे राहावे लागणार नसल्याचे सांगत अर्थमंत्री जयंत पाटील यांनी भाजपला चिमटा काढला. महात्मा फुले कर्जमाफी योजनेची सविस्तर माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मागील काही वर्ष असणारा दुष्काळ, शेतमालाला हमी भाव नसणे, अवकाळी पाऊस यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला होता. शेतकरी कर्जमाफीची मागणी शेतकरी संघटनांनी यापूर्वी देखील केली होती. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही शेतकरी कर्जमाफी मुख्य मुद्दा होता.


          शिवसेनेने निवडणुकीत संपूर्ण कर्जमाफी करत सात बारा कोरा करणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने सातबारा कोरा केला पाहिजे होता. मात्र, दोन लाख रुपयांची कर्ज माफीची घोषणा ही शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. संपूर्ण कर्जमाफी जाहीर न केल्याबद्दल राज्य सरकारचा निषेध व्यक्त करत विरोधकांनी सभात्याग केला.
 

मागे

भाजपा खासदार गौतम गंभीर यांना जीवे मारण्याची धमकी
भाजपा खासदार गौतम गंभीर यांना जीवे मारण्याची धमकी

             नवी दिल्ली - भाजपाचे खासदार गौतम गंभीर यांना जीवे मारण्....

अधिक वाचा

पुढे  

राज्यात ५० ठिकाणी सुरु होणार १० रुपयात शिवभोजन केंद्र
राज्यात ५० ठिकाणी सुरु होणार १० रुपयात शिवभोजन केंद्र

               नागपूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज १० रुपयात शिव....

Read more