By GARJA ADMIN | प्रकाशित: मार्च 29, 2019 10:59 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
चेंबूर येथील वाढवली गावातील मतदारांनी यावेळी मतदानावर बहिष्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. या विभागात असलेल एकमेव मैदान काही असामाजिक तत्त्वनी गिळंकृत करण्याचा डाव आखला आहे. त्यामुळे या विभागातील मुलांना खेळण्यासाठी मैदानच उरले नाही. म्हणूनच राहिवाश्यानी निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय घेण्याचे ठरवले आहे. वाढवली गावात मैदानच सपाटीकरण करण्याच्या नावाखाली आठ वर्षांपूर्वी खोदकाम करण्यात आले होते. त्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे उगवली आहेत.
आता या ठिकाणी असामाजिक तत्वे आणि गर्दुल्ल्याचाही वावर वाढला आहे. याबाबत आरसीएफ प्रशासन, स्थानिक खासदार, आमदार, नगरसेवक, पालिका प्रशासन यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या. पण कोणीच दाद दिली नाही म्हणूनच यावेळी अडीच ते तीन हजार मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा सामूहिक निर्णय घेतला आहे. आम्ही याच मैदानात खेळलो आता मुलांना खेळायला मैदान नसल्याने मुले वाईट मार्गाला लागत आहेत. त्यामुळे हा बहिष्कार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
शिवसेना आणि भाजप यांच्यात युती झाल्यानंतर आता दोन्ही पक्षाच्या नेत्यांकड....
अधिक वाचा