ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पोलंडचे उप परराष्ट्रमंत्री यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 13, 2019 12:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पोलंडचे उप परराष्ट्रमंत्री यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर

शहर : कोल्हापूर

पोलंडचे उप परराष्ट्रमंत्री मार्सीन प्रीझीदॅज शुक्रवार 13 आणि शनिवार 14 सप्टेंबर रोजी दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.  1942 ते  1948 या काळात पेालंडचे  5 हजार नागरिक निर्वासित म्हणून वळीवडेच्या ज्या भागात रहात होतेतेथे उभारण्यात आलेल्या स्मृतीस्तंभाचे अनावरण प्रीझीदॅज यांच्या हस्ते 14 सप्टेंबर रोजी होणार आहेअशी माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला महापालिका आयुक्त  डॉमल्लिनाथ कलशेट्टीनिवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडेकर्नल विजयसिंह गायकवाड उपस्थित होतेएक कायमस्वरूपी संग्रहालय उभे करण्यात येणार आहेकँप वळीवडे येथील जीवन आणि काळ याची आताच्या आणि पुढील पिढ्यांना माहिती व्हावी हा या संग्रहालय उभे करण्यामागचा उद्देश आहेया संग्रहालयात त्या काळातील छायाचित्रेचित्रे आणि इतर महत्वाच्या वस्तू तसेच साहित्य ठेवले जाणार आहेयेत्या वर्षभरात हे संग्रहालय उभे राहिल.

14 सप्टेंबर रोजी सकाळी हॉटेल सयाजी येथे शहरातील व्यावसायिक आणि उद्योजकांबरोबर ते परिषद घेणार आहेतया परिषदेमध्ये फौंड्रीॲन्सीलरी मशिन कम्पोनंट्सऑटो पार्ट्सहाय प्रिसीशन टूल्ससाखर आणि गुळयार्न स्पिनिंग मिल्स आणि टेक्सटाईलरासायनिक आणि डेअरी उद्योगातील प्रतिनिधी सहभागी होणार आहेतत्यानंतर पत्रकार परिषदही घेणार आहेत.

या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वळीवडे 1942 ते 1948 या काळात आपले बालपण व्यतीत केलेले पोलंडचे नागरिकही येणार आहेतहे नागरिक 15 सप्टेंबरपर्यंत कोल्हापूर येथे राहणार आहेत.

 

मागे

स्वामी विवेकानंदांचे जीवन, कार्य अभ्यासणे तरुणांसाठी  प्रेरणादायी - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
स्वामी विवेकानंदांचे जीवन, कार्य अभ्यासणे तरुणांसाठी  प्रेरणादायी - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

 स्वामी विवेकानंद म्हणजे भारतीय संस्कृतीचे मुर्तीमंत रुप होते. त्यामुळे ....

अधिक वाचा

पुढे  

कॉंग्रेसचे जेष्ठ नेते, माजीमंत्री बी. जे. खताळ-पाटील यांचे निधन
कॉंग्रेसचे जेष्ठ नेते, माजीमंत्री बी. जे. खताळ-पाटील यांचे निधन

कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री बी.जे. खताळ-पाटील यांचे आज पहाटे सव्वा....

Read more