By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 06, 2020 04:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
नवी दिल्ली - केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सोमवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार येत्या ८ फेब्रुवारीला २०२०तारखेला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होईल. तर ११ फेब्रुवारीला २०२० तारखेला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती दिली. ७० मतदारसंघ असलेल्या दिल्ली विधानसभेची मुदत २२ फेब्रुवारीला संपुष्टात येत आहे.
Chief Election Commissioner Sunil Arora on Delhi assembly elections: Date of poll is 8th February, 2020 and counting of votes will take place on 11th February. pic.twitter.com/1mv9Sa59ep
— ANI (@ANI) January 6, 2020
CEC: New concept of absentee voters introduced,enables those voters to take part in polls who are not able to come to polling stations due to physical circumstances or unavoidable reasons. PWDs & Sr citizens above 80 yrs can either vote in person or vote through postal ballot https://t.co/bjc8itbo35
— ANI (@ANI) January 6, 2020
दरम्यान, दिल्लीची यंदाची विधानसभा निवडणूक अनेक अर्थांनी लक्षणीय ठरणार आहे. महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्ये भाजपला बसलेल्या धक्क्यानंतर दिल्लीत काय घडणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. या निवडणुकीत मुख्य लढत ही आम आदमी पक्ष (आप) आणि भाजपमध्ये रंगण्याची चिन्हे आहेत.
मुंबई - जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हल्ल्यानंतर २६ नोव्हेंबर....
अधिक वाचा