By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 07, 2019 02:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : jammu
केंद्रातील सरकार विरोधी वातावरण तयार करण्यासाठी जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे कसे प्रयत्न सुरू आहेत याचा अंदाज पुलवामातील मतदानावरून बांधता येईल. येथील जनतेने मतदानाकडेच पाठ फिरवली आहे. यामुळे बुरहान वाणीच्या गावात शून्य टक्के मतदान झाले असून पुलवामात फक्त 15 नागरिकांनीच मतदान केलं आहे. दक्षिण कश्मीरमधील ज्या गावात दहशतवादी संघटनेचे कमांडर राहतात किंवा राहत होते तेथेही शून्य टक्के मतदान झाले आहे. त्राल भागातील बुरहान वाणीच्या शरीफाबाद गावात मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय गावकर्यांनी घेतला. त्यामुळे तेथे शून्य टक्के मतदान झाले. तर पुलवामा येथे सीआरपीएच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मदच्या ज्या आदिल डार या दहशतवाद्याने स्फोटक असलेली कार आदळवली त्याच्या गुंडीबाग गावात फक्त 15 नागरिकांनी मतदान केले.
तसेच अंसार गजावत उल हिंद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख झाकीर मूसा याच्या नूराबाद, हिजबुल मुजाहीदीनचा कमांडर रियाझ नायकूच्या बेगपूरा आणि पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड मुदासिर खान याच्या शेखपूरा गावातही शून्य टक्के मतदान झाले आहे. अनंतनाग लोकसभा क्षेत्रातील शोपियान आणि पुलवामा जिल्ह्यात निवडणुकीच्या दिवशी रस्त्यावर मतदार न दिसता फक्त सुरक्षा रक्षकच दिसत होते. या दोन्ही भागात दहशतवाद्यांचे वर्चस्व असून येथे अवघे तीन टक्के मतदान झाले. तर 25 टक्क्याहून अधिक मतदानकेंद्रांवर मतदानच झालेले नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातवाराणसी लोकसभा मतदारसंघातून दंड थोपटणाऱ्....
अधिक वाचा