ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'रात्रीस खेळ चाले' पार्ट – 2

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 25, 2019 08:56 AM 2019-02-12T14:15:30+5:30

'रात्रीस खेळ चाले' पार्ट – 2

शहर : मुंबई

राज्यातल्या सत्तास्थापनेच्या घडामोडींमध्ये पुन्हा एकदा रात्रीची खलबतं झाली आणि प्लॅन ठरला.महाराष्ट्रातल्या सत्तास्थापनेबदद्लच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. त्यामुळेच अजित पवार 'वर्षा'या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले. ही बैठक पाऊण तास सुरू होती.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात सत्तास्थापनेबद्दल आणि कोर्टात मांडण्याच्या भूमिकेबद्दल चर्चा झाली. या बैठकीला गिरीश महाजन, विनोद तावडे आणि महाराष्ट्राचे भाजप प्रभारी भूपेंद्र यादव उपस्थित होते.

अजित पवार यांच्यासोबत 30 आमदार आहेत, असा भाजपचा दावा आहे. त्यासोबतच अजित पवार यांच्या गटातल्या आमदारांना 10 मंत्रिपदांचं आश्वासन देण्यात आलं आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. त्याची यादी चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे. याच बैठकीत अजित पवारांनी काही महत्त्वाच्या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या,अशी बातमी एका वृत्तवाहिनीने दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र ट्वीट करून या भेटीत शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल चर्चा झाल्याचं म्हटलं आहे.

भाजपच्या नेत्यांची मदार तर अजित पवार यांच्यावरच आहे. कारण ते राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत आणि त्यांनीच काढलेला व्हिप आमदारांना लागू होतो. बहुमत चाचणीच्या वेळी अजित पवारांनी व्हिप काढला आणि त्यांच्या आदेशाविरुद्ध राष्ट्रवादीच्या आमदारांनी भाजपच्या विरोधात मत दिलं तर विधानसभा अध्यक्ष त्यांचं सदस्यत्व रद्द करू शकतात.

असं झालं तर 288 पैकी 53 आमदार कमी होतील आणि बहुमत सिद्ध करण्यासाठीची संख्या 145 ऐवजी 118 होईल. भाजपने आपले 105 आणि 15 अपक्षांसह आपल्याकडे 120 आमदार असल्याचा दावा केलाय. त्यामुळे भाजपचं बहुमत सिद्ध होतं. पण हे झालं भाजपचं गणित. आज सुप्रीम कोर्टात काय होतं त्यावरही बरंच काही अवलंबून आहे. विधानसभा अध्यक्षपदी कुणाची निवड होते हेही महत्त्वाचं आहे. पण तोपर्यंत अनेक अंदाज वर्तवले जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रणनीती मात्र ठरली आहे, असंच सगळ्या घडामोडींवरून दिसतं.

 

मागे

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच कायम, शिवसेनेलाही 'ऑपरेशन लोटस'ची भीती
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच कायम, शिवसेनेलाही 'ऑपरेशन लोटस'ची भीती

महाराष्ट्रातला सत्ता स्थापनेचा पेच आता वेगळं वळण घेत आहे. इतके दिवस वेट अॅण....

अधिक वाचा

पुढे  

पोलिसांवर विश्वास नाही.. राष्ट्रवादीच्या आमदारांवर शिवसेनानेचा 'वॉच'
पोलिसांवर विश्वास नाही.. राष्ट्रवादीच्या आमदारांवर शिवसेनानेचा 'वॉच'

महाराष्ट्रातला सत्ता स्थापनेचा पेच आता वेगळे वळण घेताना दिसत आहे. त्यात सत....

Read more