By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 03, 2020 12:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : जळगाव
जळगाव - भाजप नेते एकनाथ खडसे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट पार पडली. या दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भातली सभा घेण्यासाठी ते आले आहेत. माझ्या नाराजीबाबत कोणतीही चर्चा त्यांच्यासोबत झाली नाही असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे.
एकनाथ खडसे यांनी १२ डिसेंबरला गोपीनाथगडावर आपल्या मनात असलेली खदखद बोलून दाखवली होती. त्याच सभेत माझा काही भरवसा नाही मी कधीही पक्ष सोडू शकतो असंही खडसे म्हटले होते. एवढी सगळी नाराजी समोर आलेली असताना खडसे आणि फडणवीस भेट महत्त्वाची मानली जाते आहे. गिरीश महाजन यांनीही भाजपात सारंकाही आलबेल असल्याचं म्हटलं आहे.
एकनाथ खडसे म्हटलं की, “जिल्हा परिषदेच्या उमेदवारांसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली. या विषयापलिकडे कोणताही विषय चर्चेला नव्हता. चंद्रकांत पाटील यांच्याकडे आम्ही नावं पाठवली होती. या संदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करा असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं होतं. त्यानुसार आमची चर्चा झाली. इतर कोणत्याही विषयावर चर्चा झाली नाही. ” असं खडसे यांनी स्पष्ट केलं. दरम्यान या भेटीबाबत गिरीश महाजन यांना विचारलं असता, ” भाजपात सारं काही आलबेल आहे” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
गिरीश महाजन काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस पहाटे ४.३० ला जळगावात आले. फडणवीस हे धुळे आणि नंदुरबारला जाणार आहेत. जळगाव जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीबाबत चर्चा झाली. याबाबत आमच्या तिघांची चर्चा झाली. जिल्हा परिषद निवडणुकीची चर्चा झाली. आम्ही एक आहोत, एकत्र निवडणुकीला सामोरे जाऊ, असं गिरीश महाजन यांनी टीव्ही 9 मराठीला सांगितलं.
मी टोकाचं बोललो नव्हतो असं खडसे साहेबांनी काल सांगितलं होतं. माझ्या वक्तव्याचा विपर्यास झाला असं खडसेंनी सांगितलं मलाही ते बोलले. जिल्हा परिषद निवडणुकीबाबत कोअर कमिटीची बैठक झाली. जिल्हा परिषद अध्यक्ष – उपाध्यक्ष निवडणुकीबाबत आम्ही एकमताने नावं ठरवली आहेत, असंही महाजन यांनी सांगितलं.
नक्षलवादी कारवायांच्या धोक्यापासून राज्यातील नागरिकांचे संरक्षण व्....
अधिक वाचा