ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडमध्ये, ठाकरे सरकारवर 24 तासात दुसर टीकास्त्र

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 29, 2019 11:26 AM 2019-02-12T14:15:30+5:30

देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडमध्ये, ठाकरे सरकारवर 24 तासात दुसर टीकास्त्र

शहर : मुंबई

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत पाहायाला मिळत आहेत. कारण शपथविधीनंतर तातडीने ठाकरे सरकारवर हल्ला केल्यानंतर, आता देवेंद्र फडणवीसांनी दुसरा हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीसांनी यावेळी पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारवर हल्ला केला. शिवाय बहुमत असताना लपून-छपून सभागृह बोलावण्याचा निर्णय का? असा प्रश्न फडणवीसांनी विचारला आहे. फडणवीस यांनी 3 ट्विट करुन सरकारवर टीकास्त्र सोडलं.

देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट

कालच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यावर चर्चा करण्याऐवजी लपुन-छपून बहुमत कसे सिद्ध करता येईल, यावर चर्चा करण्यात नव्या सरकारने धन्यता मानली. मग बहुमताचे दावे कशासाठी? ‪या सरकारकडे बहुमत असेल तर लपून-छपून सभागृह बोलावण्याचा निर्णय का? ‪नियमबाह्य पद्धतीने प्रो-टेम अध्यक्ष बदलण्याचा प्रयत्न कशासाठी? ‪स्वत:च्या आमदारांवर अजूनही इतका अविश्वास का? ‪अजूनही त्यांना डांबून ठेवण्याची शिक्षा का? ‪भाजपने विरोधी पक्षात बसण्याची घोषणा केली असताना आणि महाविकास आघाडीने निरनिराळ्या प्रकारे बहुमताचे प्रदर्शन आणि दावे केले असताना ही लपवा-छपवी आणि भीती का? ‪महाराष्ट्राला याचे उत्तर हवे आहे!” असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

देवेंद्र फडणवीस यांनी काल ठाकरे सरकारवर पहिला हल्ला चढवला होता. देवेंद्र फडणवीस यांनी आधी अभिनंदनाचं ट्विट केल्यानंतर दुसरं ट्विट थेट टीका करणारं केलं. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या किमान समान कार्यक्रमावर देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडलं.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे, “महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात वारेमाप घोषणा असल्या तरी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या विकासाच्या वाटचालीत वर्षानुवर्षे मागे राहिलेल्या क्षेत्राचा साधा नामोल्लेख सुद्धा असू नये, हे दुर्दैवी आहे. नवे सरकार त्याकडे लक्ष देईल, अशी आशा करू या!

 

मागे

मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय
मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय

गुरुवारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहीत सहा कॅबिनेट मंत्र्यांच्या ....

अधिक वाचा

पुढे  

आता गोव्यात राजकीय भूकंप घडेल - संजय राऊत
आता गोव्यात राजकीय भूकंप घडेल - संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद खेचून आणल्यान....

Read more